दिल्ली शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध

Pib
सोमवार, 15 जून 2020

या कंपन्यांसाठी आपत्कालीन तरतूदी लागू करून स्थानिक वैद्यकीय चाचण्यांच्या आवश्यकतेमधून सूट दिली गेली आहे. सीडीएससीओद्वारे नियामक प्रक्रिया सुलभ आणि वेगवान केल्या जात आहेत.

 दिल्ली,

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले की, दिल्लीमध्ये कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी आणि देशाची राजधानी असलेल्या दिल्ली शहराला सुरक्षित ठेवण्यासाठी मोदी सरकार वचनबद्ध आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत झालेल्या या बैठकीत, कोरोना संसर्गापासून दिल्लीच्या नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी या बैठकीत अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले गेले.

अमित शहा म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सावधगिरीने व सर्वांच्या सहकार्याने देश या जागतिक उद्रेका विरुद्ध लढत आहे. या संकटाच्या वेळी अनेक स्वयंसेवी संस्था उत्कृष्ट कार्य करत आहे, यासाठी संपूर्ण देश त्याचा ऋणी राहील. याच प्रयत्नांमध्ये,सरकारने स्काउट्स आणि गाईड, एनसीसी, एनएसएस आणि इतर स्वयंसेवी संस्थांना आरोग्य सेवेमध्ये स्वयंसेवक म्हणून नोंदणी करून घेण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना विषाणूंविरूद्ध प्रभावीपणे लढा देण्यासाठी केंद्र सरकारने आणखी पाच वरिष्ठ अधिकाऱ्यांची दिल्ली सरकारमध्ये नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे.

आरोग्य मंत्रालयाची कोविड-19  घडामोडींवरील माहिती  

गेल्या 24 तासात कोविड-19 चे 8,049 रुग्ण बरे झाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर 50% हून अधिक झाला आहे. कोविड-19 चे आत्तापर्यंत एकूण 1,62,378 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या रुग्ण बरे होण्याचा दर50.60% आहे. यावरून हे निदर्शनास येते कि कोविड-19 च्या एकूण रुग्णांपैकी निम्मे रुग्ण या आजारातून बरे झाले आहेत. संक्रमित लोकांचे वेळेवर निदान आणि योग्य उपचार व्यवस्थापन हाच रुग्ण बरे होण्याचा मार्ग आहे.

सध्या 1,49,348 सक्रिय रुग्ण वैद्यकीय निरीक्षणाखाली आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद आयसीएमआरने संक्रमित व्यक्तींमध्ये नोवेल कोरोना विषाणू शोधण्यासाठी चाचणी क्षमता वाढविली आहे. सरकारी प्रयोगशाळांची संख्या 646 पर्यंत तर खाजगी प्रयोगशाळांची संख्या 247 पर्यंत वाढविण्यात आली आहे. (एकूण 893 प्रयोगशाळा) गेल्या 24 तासांत 1,51,432 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली. आतापर्यंत एकूण56,58,614 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे.

कोविड-19 च्या वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉलचा भाग म्हणून रेमडेसिविरचा वापर आणि देशातील त्याची उपलब्धता या संदर्भात काही माध्यमे  वृत्त देत आहेत.   

 आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने 13 जून 2020  रोजी कोविड -19 साठी एक अद्ययावत वैद्यकीय व्यवस्थापन प्रोटोकॉल प्रसिद्ध  केला आहे ज्यामध्ये रेमडेसिविर या औषधाचा  केवळ आणीबाणीच्या वापरासाठी मर्यादित उद्देशानेच' 'इन्व्हेस्टिगेशनल  थेरपी 'म्हणून  तसेच टोसिलीझूमब आणि कॉन्व्हॅलेसन्ट  प्लाझ्माचा ऑफ लेबल वापरासह (ते औषध ज्या आजारांवर उपचार करते त्यांव्यतिरिक्त इतर लक्षणांसाठी)  समावेश केला आहे.

या प्रोटोकॉलमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की या उपचारांचा वापर सध्या मर्यादित उपलब्ध पुरावे आणि मर्यादित उपलब्धतेवर आधारित आहे. आणीबाणीत  वापर म्हणून रेमडेसिविरचा वापर मध्यम आजार (ऑक्सिजनवर) असलेल्या रुग्णांमध्ये करण्याबाबत विचार केला जाऊ शकतो ,मात्र जर एखाद्या रुग्णाला एखादे औषध देऊ नये अशी सूचना असेल तर रेमडेसिविरचा  वापर करू नये.

यूएस फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशनने (यूएसएफडीए) अद्याप या औषधाला मंजुरी दिलेली नाही (बाजार अधिकृतता), भारतासारख्या देशात केवळ आपतकालीन वापराच्या अधिकाराखाली ते सुरु आहे.

देशात प्रौढ आणि मुलांवर प्रतिबंधित औषधांचा आपत्कालीन वापर गंभीर आजारामुळे रूग्णालयात दाखल संशयित किंवा प्रयोगशाळेने पुष्टी केलेल्या कोविड -19 च्या उपचारासाठी करणे पुढील अटींच्या अधीन आहे-  प्रत्येक रूग्णाची लेखी परवानगी आवश्यक, अतिरिक्त वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल सादर करणे, उपचार केलेल्या सर्व रूग्णांची सक्रीय देखरेख माहिती सादर करणे ,सक्रिय पोस्ट मार्केटींग देखरेखीसह  जोखीम व्यवस्थापन आराखडा  तसेच  गंभीर प्रतिकूल घटनांचा अहवालदेखील सादर करावा. याव्यतिरिक्त, आयात केलेल्या मालाच्या पहिल्या तीन बॅचेसची चाचणी करावी आणि केंद्रीय औषध मानक नियंत्रण संघटनेकडे (सीडीएससीओ) अहवाल पाठवावा.

मेसर्स गिलिडने 29 मे 2020 रोजी भारतीय औषध नियामक संस्थेकडे अर्थात सीडीएससीओला, रेमडेसिविरच्या आयात आणि विपणनासाठी अर्ज केला होता. विचार विनिमयानंतर, रुग्णांच्या सुरक्षेच्या हितासाठी आणि पुढील माहिती मिळवण्यासाठी 1 जून 2020 रोजी आपत्कालीन वापराच्या अधिकाराअंतर्गत परवानगी देण्यात आली. 

मेसर्स हेटेरो, मेसर्स सिप्ला, मेसर्स बीडीआर, मेसर्स ज्युबिलंट, मेसर्स मायलन आणि डॉ. रेड्डीज लॅब या सहा भारतीय कंपन्यांनीही सीडीएससीओकडे  भारतात औषध निर्मिती आणि विपणनासाठी परवानगी मागितली आहे. यातील पाच जणांनी मेसर्स गिलिडबरोबर  करार केला आहे.  सीडीएससीओद्वारे या अर्जांची  प्राधान्याने  आणि निहित प्रक्रियेनुसार छाननी केली जात आहे. कंपन्या उत्पादनाच्या सुविधांची तपासणी, आकडेवारीची पडताळणी, स्थिरता चाचणी, प्रोटोकॉलनुसार आपत्कालीन प्रयोगशाळेच्या तपासणी इत्यादींच्या विविध  टप्प्यात आहेत. इंजेक्टेबल औषध असल्यामुळे तपासणी, ओळख, शुद्धीकरण , जीवाणूच्या एंडोटॉक्सिन चाचणी करणे रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्वाचे आहे आणि कंपन्यांनी ही माहिती प्रदान करणे आवश्यक आहे. सीडीएससीओ माहितीच्या प्रतीक्षेत आहे आणि या कंपन्यांना पूर्ण पाठिंबा देत आहे.

संबंधित बातम्या