''कोरोना परिस्थिती हाताळण्यात मोदी सरकार असफल''

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 7 मे 2021

देशातील सध्याच्या कोरोना परिस्थिती आणि एकंदर आरोग्य व्यवस्थेवर कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

देशातील सध्याच्या कोरोना परिस्थिती आणि एकंदर आरोग्य व्यवस्थेवर कॉंग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. सध्याच्या बिघडलेल्या परिस्थितीबद्दल सोनिया यांनी केंद्रावर अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याचबरोबर त्यांनी केंद्र सरकारकडे सर्वपक्षीय बैठक बोलविण्याची मागणी केली आहे. कोरोनामुळे बिघडलेल्या परिस्थितीवर लक्ष ठेवण्याची विनंती त्यांनी स्थायी समितीला केली आहे. (''The Modi government failed to handle the Corona situation")

कोरोनानंतर दिल्लीत ‘ब्लॅक फंगस’ च सावट

सोनिया गांधी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कॉंग्रेस राज्यसभा आणि लोकसभेच्या खासदारांची बैठक घेतली. देशातील कोरोनामुळे परिस्थिती आणखी वाईट होत चालली आहे. यावर मात करण्यासाठी सरकारने ठोस रणनीती अवलंबली पाहिजे असे सोनिया गांधी म्हणाल्या. पुढे सोनिया गांधी म्हणाल्या , यंत्रणा नाही तर मोदी सरकार अपयशी ठरले आहे. मोदी सरकारने संसाधने आणि शक्तीचा योग्य वापर केला नाही. मोदींच्या नेतृत्त्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सोनिया गांधी म्हणाल्या की, देशाला असे राजकीय नेतृत्व मिळाले ज्याला जनतेशी सहानुभूती नाही.

भाजपा शासित काही राज्य सरकारांबद्दल सोनिया गांधी म्हणाल्या की लोकांना मदत करण्याऐवजी मदत करणार्‍यांवर कारवाई केली जात आहे. लोक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सत्य लिहिण्यापासून लोकांना रोखत आहेत. सोनिया गांधी यांनी तातडीने सर्वपक्षीय बैठक बोलाविण्याची मागणी केली.कॉंग्रेस शासित राज्यांतील लोकांना मदत देण्याच्या गरजेवर जोर देताना त्या म्हणाल्या आम्हाला अधिकाधिक कार्यक्षमता आणि तत्परतेने संघर्ष करावा लागेल. ही सरकार विरूद्ध आपली लढाई नाहीये. ही आपली विरुद्ध कोरोनाची लढाई आहे. सर्वांना एकजुटीने संघर्ष करावा लागेल.

एम. के. स्टॅलिन तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री; मंत्रिमंडळात अनुभवी नेत्यांसह...

सोनिया गांधी यांनीही युवक कॉंग्रेसच्या योगदानाचे कौतुक केले. याआधी राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याची मागणी केली होती. कोरोनाचे नवीन रुग्ण दिवसेंदिवस नवीन रेकॉर्ड करत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे एकूण 4,14,188 नवीन रुग्ण आढळले आहेत आणि 3,915 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.

संबंधित बातम्या