मोदी सरकारचा मोठा निर्णय; पेट्रोल मध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळण्यास परवानगी 

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जून 2021

मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे.

कारखानदार आणि शेतकरी यांच्यातील साखरेच्या दरावरुन निर्माण होणारा वाद महाराष्ट्राला काही नवा नाही. परंतु आता पेट्रोलमध्ये(Petrol) 20 टक्के इथेनॉल(Ethanol)मिसळण्याचा निर्णय झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे.साखर उद्योगांकडून शेतकऱ्यांना (farmers)  आता चांगला दर घेत येणार आहे. मोदी सरकारने देशातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याचे काम केले आहे. केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे माजी सहकार मंत्री आणि राज्य सहकारी साखर संघाचे सदस्य हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) यांनी व्यक्त केले आहे. (Modi governments big decision Permission to mix 20 per cent ethanol in petrol)

कोरोना महामारीचा साखर उद्योगावर परिणाम

देशातील पाच कोटी शेतकरी ऊसाचे पिक घेतात. त्यापैकी महाराष्ट्रातील 40 लाख शेतकरी ऊस पिकवतात. दरवर्षी साखर उद्योगातून 50-60 कोटीची उलाढाल होते. कोरोना काळात सध्या साखरेला उठाव नाही. राज्यातील साखर कारखान्याची साखर गोदामात पडून आहे. त्यामुळे राज्यातील साखर उद्योगाला अनेक अडचणीचा सामना करावा लागत असताना आता पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिश्रणाच्या निर्णयामुळे साखर कारखान्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.  

शेतकऱ्यांना मिळणार चांगला दर 

ऊस हे नगदी पिक असून रोख पैसे उपलब्ध करुन देते. 320 लाख मेट्रिक टन साखर देशात उत्पादित होते. तर दुसरीकडे देशांतर्गत साखरेची मागणी 250 लाख मेट्रिक टन आहे. युरोपच्या (Europe) तुलनेत भारतात (India)साखरेचा वापर कमी आहे. सध्या औद्योगिक वापरासाठी 65 टक्के साखर तसेच घरगुती वापरासाठी 35 टक्के साखरेचा उपयोग केला जातो. तुलनेत 8 लाख मेट्रिक अतिरिक्त साखर साखर कारखान्यांच्या गोदामात पडून राहते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीचा सामना करावा लागत होता. मात्र आता  केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळवता येणार आहे.

जैवइंधनविषयी राष्ट्रीय धोरण

मोदी सरकारने 2018 मध्ये जैवइंधनविषयी राष्ट्रीय धोरण (National policy on biofuels) अमलात आणले आणि त्यानुसार डिझेल, पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचे बंधन घातले होते. केंद्र सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक इंधन कंपन्याचे 186 ऑईल डेपो आणि 179 शुद्धीकरण प्रकल्पांमध्ये इथेनॉल मिसळण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली. 2012 मध्ये ५ टक्के, 2017 मध्ये 10 टक्के इथेनॉल पेट्रोल, डिझेलमध्ये मिश्रणासंबंध कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती. यामुळे आता शंभरी गाठलेल्या पेट्रोलचे दर कमी होण्यास मदत होणार आहे. 

संबंधित बातम्या