मोदी सरकारच्या घोषणांची पूर्तता : चंद्रू  एसळे

Dainik Gomantak
शुक्रवार, 12 जून 2020

अलीकडच्या काळात कारवार जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार यांनी हल्याळ येथे भेट दिली होती. विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते यांच्या निवासस्थानी भेट दिल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे.

हल्याळ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले वर्ष यशस्वीपणे पूर्ण केले असून, या पहिल्या वर्षात भाजप सरकारने जाहिरनाम्यात ज्या घोषणा केल्या होत्या त्यातील बहुतांश घोषणांची पूर्तता करण्यात आली असल्याची माहिती कारवार जिल्हा भाजपचे प्रधान कार्यदर्शी चंद्रू एसळे यांनी सांगितले.
हल्याळ येथील गणेश कल्याण मंडप येथे हल्याळ-जोयडा दांडेली येथील भाजप पदाधिकाऱ्यांच्‍या उपस्थितीत केंद्र सरकारच्या दुसऱ्या वर्षातील जाहिरनाम्याचे प्रकाशन करून ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते. केंद्र सरकारच्या कामाची पूर्तता ही जनतेच्या मनात ठेवण्‍यासारखी आहे. सर्व कार्यकर्त्यांनी सरकारच्या योजना घरोघरी पोचवा असे ते कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले. येणाऱ्या काळात हल्याळ तालुक्यात भाजप संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे, असेही ते म्‍हणाले.
अलीकडच्या काळात कारवार जिल्हा पालकमंत्री शिवराम हेब्बार यांनी हल्याळ येथे भेट दिली होती. विरोधी काँग्रेस पक्षाचे नेते यांच्या निवासस्थानी भेट दिल्याबद्दल भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे. जिल्ह्यातील राजकारण वेगळे हल्याळ येथील राजकारण वेगळे असे ते म्हणाले, याबद्दल भाजप जिल्हा अध्यक्षांचे लक्ष वेधले जाईल, असे चंद्रू एसळे म्हणाले.
जाहिरनाम्याचे प्रकाशन करताना व्यासपीठावर हल्याळ-जोयडा-मतदारसंघाचे माजी आमदार सुनील हेगडे, अशोक चलवादी, जिल्हा उपाध्यक्ष उमेश बंकापूर, जोयडा भाजप अध्यक्ष संतोष रेडकर, दांडेली भाजप अध्यक्ष चंद्रकांत क्षीरसागर, हळीयाळ भाजप अध्यक्ष गणपती करजेकर, बसवराज कलशटी, तुकाराम मांजरेकर, गुरू मठपती, शिवाजी नरसानी, अनिल मुतनाळ, यल्लापा होनाजी, चंद्रू कम्‍मार, शांता हिरेकर व भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्‍येने उपस्थित होते.

संबंधित बातम्या