मोदींनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं

कोरोना फैलावाबाबत पंतप्रधानांनी सर्व मुख्यमंत्र्यांसोबत घेतली बैठक
Narendra Modi on Petrol-Diesel Price
Narendra Modi on Petrol-Diesel PricePM modi

नवी दिल्ली : वाढत्या इंधन दर वाढीवरुन नाराजीचा सुर असल्याचे चित्र सामान्य नागरिकांत असून यामूळे केंद्र सरकारवर विरोधी गटांनी यापूर्वी ही संसदेत आवाज उठवला आहे. मात्र यावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाष्य केले नव्हते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना फैलावाबाबत देशातील सर्व मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीत पंतप्रधानांनी इंधन दरांवरुन महाराष्ट्राला सुनावलं आहे. (Modi scolded Maharashtra over fuel rates)

Narendra Modi on Petrol-Diesel Price
'स्वार्थ', निवडणूक लढवण्यासाठी पाच राज्यांमध्ये 276 उमेदवारांनी बदलले पक्ष : ADR रिपोर्ट

याबाबत मोदींनी या बैठकिदरम्यान इंधनवारील व्हॅट कमी न करण्याच्या राज्यांची थेट नावेच घेतली आणि खडे बोल सुनावले. देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी केला पाहिजे असं नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले आहेत. इंधनाच्या वाढत्या दरांचं ओझं देशवासियांवर पडू नये यासाठी केंद्र सरकारने गेल्या नोव्हेंबर महिन्यात अबकारी कर कमी केला होता. पण काही राज्यांनी इंधनाचे दर कमी केलेले नाहीत. यामुळे त्या - त्या राज्यातील लोकांवर अन्याय आहे. असे ही ते यावेळी म्हणाले.

Narendra Modi on Petrol-Diesel Price
'कोरोना विरोधात लस हेच कवच'; पंतप्रधान मोदींचे राज्यांना मोठे आवाहन

राज्यातील नागरिकांच्या भल्यासाठी तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, झारखंड, महाराष्ट्र, पश्चिम बंगाल या राज्यांनी ऐकलं नाही आणि त्यांच्या राज्यातील नागरिकांवरील ओझं कायम राहिलं. पण आता देशहितासाठी सहा महिन्यांनी का होईना व्हॅट कमी करत लोकांना याचा लाभ दिला पाहिजे,” असा सल्ला यावेळी नरेंद्र मोदींनी दिला. तसेच तिसऱ्या लाटेत जास्त केसेस असतानाही व्यवहार सुरु ठेवले होते. असंच काम पुढे सुरु राहिलं पाहिजे. संक्रमणाला सुरुवातीलाच रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम केलं पाहिजे,” असं मोदींनी सांगितलं.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com