मोदी- राहुल आमनेसामने
Modi Vs Rahul in Bihar

मोदी- राहुल आमनेसामने

पाटणा:  बिहार विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये आजचा दिवस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेसचे वरिष्ठ नेते राहुल गांधी यांच्या सभांमुळे गाजला.

मोदी यांनी राज्यातील विकास, ३७० वे कलम आदी मुद्यांवरून विरोधकांना धारेवर धरले. सासाराम, गया, भागलपूर जिल्ह्यांत पंतप्रधानांच्या सभा पार पडल्या. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची नवादा जिल्ह्यातील हिसुआमध्ये सभा झाली. तेथे त्यांनी गलवान खोऱ्यात चीनसोबत झालेल्या संघर्षावरून मोदींवर टीका केली. देशाच्या हद्दीमध्ये चीनने घुसखोरी केली असतानाही पंतप्रधान मोदी मात्र ही बाब फेटाळून लावत होते, असे करून त्यांनी जवानांचा अवमान केल्याचा आरोप राहुल यांनी केला.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com