''फोटो छापण्याच्या शर्यतीत मोदीजी अग्रेसर''

''फोटो छापण्याच्या शर्यतीत मोदीजी अग्रेसर''
Modiji leads in photo printing race

मुंबई : पश्चिम बंगालसह पाच राज्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. केंद्रीय निवडणूक आयोगाने पाच राज्यांच्या तारखाही जाहीर केल्या आहेत. भाजप आणि तृणमुल कॉंग्रेस यांच्यात काट्याची टक्कर पहायला मिळत आहेत. तृणमुल कॉंग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. नुकतेच तृणमुल कॉंग्रेसचे माजी नेते आणि खासदार दिनेश त्रिवेदी यांनी भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या उपस्थीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या निवडणूकीच्या धामधुमीतच पश्चिम बंगालमध्ये लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मात्र लसीकरणाच्य़ा प्रमाणपत्रावरुन वाद पहायला मिळत आहे. तृणमुल कॉंग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लसीकरण प्रमाणपत्रावरील फोटोला आक्षेप घेत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. याच मुद्द्यावरुन राष्ट्रवादी कॉंग्रेसने पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

काही दिवसांपूर्वी पेट्रोल पंपावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे असलेले होर्डींग काढण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले होते. त्यानंतर आता लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरील फोटोही काढण्याचे देश आरोग्य मंत्रालयाने दिले आहेत. याच मुद्द्यावर बोलताना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रदान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

‘’पंतप्रधान नरेंद्र मोदी फोटो छापण्याच्या शर्यतीत खूपच पुढे निघून गेले आहेत. सर्व पेट्रोल पंप, रेल्वे स्थानके, निमानतळावर मोदींचाच फोटो दिसतो. खादीच्या कॅलेंडरवरही महात्मा गांधीच्या फोटोच्या जागी स्वत:चा फोटो छापला. आता लसीकरणाच्या प्रमाणपत्रावरही मोदींचा फोटो लावण्यात आला आहे. हे अशाप्रकारे चालत राहील तर मोदीजी नोटेवरुन गांधींचा फोटो हटवून स्वत: फोटो छापतील’’ अशा शब्दात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे.

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com