'राजकारणातील घराणेशाही  लोकशाहीचा मोठा शत्रू' कोणत्याही पक्षांचा उल्लेख न करता मोदींचा हल्लाबोल 

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 13 जानेवारी 2021

तरुणांनी राजकारणात यावं आणि या घराणेशाहीला समूळ नष्ट करावं असं म्हणत मोदींनी घराणेशाहीवर हल्लाबोल केला.घराणेशाहीमुळे ज्यांचा उदय झाला त्यांना कायद्यांबद्दल अजिबात आदर वाटत नाही.

नवी दिल्ली: राजकारणातील घराणेशाही लोकशाहीचा मोठा शत्रू असून नव्या स्वरुपाच्या हुकुमशाहीचा जन्म झाला.आणि पर्यायाने देशावर अकार्यक्षमतेचा बोजा पडला अशा स्वरुपाची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्याही पक्षाचा उल्लेख न करता केली.मात्र या आगोदर मोदींनी केलेल्या टीकेचा रोख पाहता त्यांनी यावेळीही कॉंग्रेसवर निशाना साधला.दुसऱ्या राष्ट्रीय युवा संसद मोहत्सवाच्या समारोप सोहळ्याला मोदींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा संबोधित केलं.

तरुणांनी राजकारणात यावं आणि या घराणेशाहीला समूळ नष्ट करावं असं म्हणत मोदींनी घराणेशाहीवर हल्लाबोल केला.घराणेशाहीमुळे ज्यांचा उदय झाला त्यांना कायद्यांबद्दल अजिबात आदर वाटत नाही.आणि त्यांना भीती तर मुळीचं राहीलेलीचं नाही.कारण आपल्या पूर्वजांना भ्रष्टाचाराबद्दल जबाबदार धरण्यात आलेलं नाही,असा त्यांचा समज झालेला आहे,असेही मोदी म्हणाले.स्वता:च्या कुटुंबामध्ये त्यांना अशाप्रकारची उदाहरणे पहायला मिळाली असल्याकारणाने संभवतःहा त्यांच्या मनात कायद्यांबद्दल कोणत्याही प्रकारचा आदर अथवा भीतीही राहीली नाही,असं ते म्हणाले.

नवनव्या बदलांसाठी युवकांनी राजकारणात यावं असं आवाहन ही पंतप्रधानांनी केलं.राजकारणात आडनावाच्या आधारे जे निवडून येतात त्यांना भवितव्य नसतं.मात्र राजकारणातून या विकारांचे अद्याप तरी समूळ उच्चाटन झालेलं नाही असेही ते म्हणाले.राजकारणात असेही लोक आहेत की, त्यांचा उद्देश मात्र एकचं असतो तो म्हणजे कुटुंबाच्या राजकारणाचा बचाव करणं.घराणेशाहीच्या राजकारणामुळे आपण आणि आपले कुटुंब एवढीचं भावना तयार होते,'देश प्रथम'असतो ही भावना खूप मागे पडते,असंही  यावेळी पंतप्रधान म्हणाले.

संबंधित बातम्या