वर्षाअखेर मोदींचा अमेरिका दौरा? पहिल्यांदाच होणार राष्ट्राध्यक्ष बायडन यांची भेट

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 10 जून 2021

सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Covid19) वाढत असताना दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आता या वर्षाच्या शेवटला अमेरिकेचा (America) दौरा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेची राजधानी असणाऱ्या वॉशिंग्टन डी. सी (Washington d. C) मध्ये पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडन (Joe Biden) यांची भेट घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोनामुळे भारत आणि अमेरिकेतील परिस्थिती बिघडली नसती तर या वर्षी पंतप्रधान मोदी यांचा अमेरिका दौरा होण्याची दाट शक्यता होती. तसेच भारत आणि अमेरिकेतील वरिष्ठ अधिकारी या भेटीच्या संदर्भात चर्चा करत असल्याचे वृत्त डेक्कन हेरॉल्डने दिले आहे. सप्टेंबर ते नोव्हेंबर दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन आणि पंतप्रधान मोदी यांच्या दरम्यान आत्तापर्यंत दोन वेळा फोनवरुन चर्चा झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये मोदी आणि बायडन यांनी दोन वेळा व्हर्चूअल माध्यमातून सहभाग घेतला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अमेरिकेचा दौरा केला तर दोन्ही नेत्यांमधील ही पहिलीच बैठक असेल. अमेरिकेत सत्तापालट झाल्यानंतर पंतप्रधान मोदींचा हा पहिला दौरा असणार आहे.

मोदी सरकारचा मोठा निर्णय; शेतकऱ्यांसाठी अच्छे दिन

बायडन प्रशासनाकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना वॉशिंग्टनमध्ये आमंत्रित करण्याची योजना दिल्लीला (Delhi) कळवण्यात आली आहे. या वर्षाच्या शेवटच्या काही महिन्यांमध्ये हा दौरा आखण्यात येण्याची शक्यता आहे. या संदर्भात दोन्हीबाजूंकडून चर्चा झाली आहे. मात्र दोन्ही देशातील कोरोनाचे संकटाची परिस्थिती कशी असेल यावर दौऱ्यासंदर्भातील निर्णय घेण्यात येईल. दोन्ही देशतील कोरोनाची परिस्थिती गंभीर नसेल तरच दौऱ्याबद्दल नसेल तरच मोदींच्या दौऱ्याबद्दल विचार केला जाईल असे दिल्लीतील सूत्रांनी सांगितले आहे.

''सरकार फक्त श्रेय घेत राहिलं''... अमर्त्य सेन यांचा मोदी...

अमेरिका दौऱ्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बायडन प्रथमच प्रत्यक्षात दोन देशांचे प्रमुख भेटणार आहेत. यासोबतच क्वाड देशांचे प्रमुख या दौऱ्यादरम्यान एकत्र येऊ शकतात. क्वाड देशांच्या प्रमुखांची बैठक घेण्यासंदर्भात बायडन यांनी हालचाली सुरु केल्या आहेत. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान स्कॉट मॉरिसन (Scott Morrison) आणि जपानचे पंतप्रधान योशिहिदे सुगा (Yoshihide Suga) यांनाही बायडन प्रशासनाकडून याच कालावधीमध्ये अमेरिकेच्या भेटीचे आमंत्रण देण्यात येण्याची शक्यता आहे. 

संबंधित बातम्या