‘’जुडासने इसा मसिहाला धोका दिला’’ असं म्हणतं मोंदीचा पिनरयी विजयन सरकारवर हल्लाबोल

‘’जुडासने इसा मसिहाला धोका दिला’’ असं म्हणतं मोंदीचा पिनरयी विजयन सरकारवर हल्लाबोल
Mondis Pinarayi Vijayan attacks government says Judas threatens Jesus Christ

भाजपमध्ये अलिकडेच प्रवेश केलेले मेट्रोमॅन ई. श्रीधरन येत्या 6 एप्रिलला होणाऱ्या केरळ विधानसभेच्या निवडणुकीत भाजप पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असतील असे भाजपचे जेष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले. याच पाश्वभूमीवर मेट्रोमॅन यांना पल्लकडमधील विधानसभा प्रचार सभेत भाजपकडून प्रचार करण्यासाठी उतरवण्यात आले आहे. ज्यांनी दिल्लीमधील मेट्रो तथा देशभरातील अन्य  परियोजना लागू करण्यासाठी काम केले ते आता राजकिय प्रचार करणार आहेत. 88 वर्षीय श्रीधरन यांनी दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनमधील आपली 24 वर्षांची सेवा संपवत असल्याचा निर्णयही गुरुवारी जाहीर केला.

नामांकित टेक्नोक्रॅट यांच्यासोबत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व्यासपीठावर उपस्थित असताना म्हटले, ‘’मेट्रो मॅन श्रीधरन हे आगळेवेगळे व्यक्तिमत्व आहे. ज्यांनी भारताला आधुनिक बनवण्यासाठी योगदान दिले तसेच संदेशवहन क्षेत्रात अत्याधुनिक काम केले. याशिवाय समाजीतल सर्व घटकांना ते पसंद आहेत. ज्यांनी केरळच्या प्रगतीसाठी आपल्या आयुष्याचा त्याग केला. केरळच्या प्रामाणिक पुत्राच्या रुपात सत्तेचा मोह न बाळगता आपली सेवा प्रधान केली. तसेच आपल्या कार्यविषयी प्रतिबध्दता दृढ ठेवली..’’ (Mondis Pinarayi Vijayan attacks government says Judas threatens Jesus Christ)

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी एलडिएफ पक्षावर निशाणा साधत, ‘’गोल्ड स्मगलिंग घोटाळ्याचा उल्लेख केला. ज्यामध्ये केरळचे मुख्यमंत्री पिनरयी विजयन यांच्या कार्यलयावर आरोपांच्या फैरी झडल्या होत्या. जुडासने चांदीच्या सिक्क्यांसाठी झीजस क्राइस्टला धोका दिला. बिल्कुल तशाचप्रकारे एलडिएफने सोन्याच्या काही तुकड्यांसाठी केरळच्या जनतेला धोका दिला.’’

मेट्रो मॅन श्रीधरन यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीला राज्यात सत्तेवर येण्याची संधी मिळाली तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही केरळमध्ये विकासकांमाची दहापटीने अमंलबजावणी करु शकू असा आम्हाला विश्वास आहे, असे के.सुरेंद्रन यांना पक्षाच्या पार पडलेल्या बैठकित बोलताना सांगितले. 
 

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com