ईडीची कारवाई: चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांना अटक

पीटीआय
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आज दीपक कोचर यांना अटक केली.

मुंबई: आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) आज दीपक कोचर यांना अटक केली. आयसीआयसीआय बँकेच्या माजी मुख्यकार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालिका चंदा कोचर यांचे ते पती आहेत. अटकेपूर्वी ईडीने त्यांची दुपारपासून चौकशी केली होती. ईडीने याप्रकरणी मुंबई व औरंगाबाद येथील १२ ठिकाणी छापे घातले होते. 

चंदा कोचर या बॅंकेच्या कार्यकारी संचालक आणि सीईओ असताना, त्यांनी व्हिडीओकॉन कंपनीला पदाचा गैरवापर करत ३२५० कोटींचे कर्ज दिले. हे कर्ज देताना कोचर यांनी व्यक्तिगत हित बघितले आणि त्याचा फायदा घेतला, असा त्यांच्यावर आरोप होता. उद्योगपती वेणुगोपाल धूत आणि चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांनी एकत्र येऊन नूपॉवर रिन्यूवेबल ही कंपनी स्थापन केली होती. त्या कंपनीच्या नावावर ६४ कोटी रुपयांचे कर्ज घेण्यात आले होते. 
 

संबंधित बातम्या