COVID19: ऐकावं ते नवलच! कोरोनाच्या भीतीने माकडांचही केलं विलगीकरण

दैनिक गोमंतक
गुरुवार, 20 मे 2021

दिल्ली (Delhi) वन विभागाने (Forest Department) तुघलकाबाद येथील ऍनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये 14 दिवसांसाठी या माकडांना (Monky) विलगीकरणात (Isolation) ठेवले आहे. 

जगभरातून समोर आलेल्या काही घटनांमधून माणसांसोबतच प्राण्यांना देखील कोरोना संसर्गाचा धोका असल्याचे समोर आले आहे. असाच काहीसा प्रकार सध्या दिल्लीमध्ये (Delhi) होत असल्याचे समोर आले आहे. दक्षिण दिल्लीतील (South Delhi) कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात होत असलेल्या काही ठिकाणच्या माकडांना (Monky) दिल्लीच्या वनविभागाने विलगीकरणात (Isolation) ठेवले आहे.  वन विभागाने तुघलकाबाद येथील ऍनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये 14 दिवसांसाठी या माकडांना विलगीकरणात ठेवले आहे. 

दिल्ली सरकारच्या (Delhi Government) वन विभागाने (Forest Department) दिल्लीच्या काही ठिकाणच्या माकडांना पकडू त्यांना विलगीकरण केले असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः ज्या भागांमध्ये कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात झाला आहे, अशाच काही भागांतील 60 माकडांना वन विभागाने  विलगीकरणात ठेवले असल्याचे समजते आहे. यातील 30 माकडांची विलगीकरणाची प्रक्रिया पूर्ण सुद्धा झाली आहे. 

Cyclone Yaas: सावधान! पुन्हा एक चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकणार

आतापर्यन्त एकाही माकडात कोरोनाची लक्षणं आढळून आली नसून या माकडांची अँटिजन (Antigen) चाचणीचा अहवाल सुद्धा निगेटिव्ह आला आहे. हैद्राबादमधील काही सिंह कोरोना संक्रमित झाल्याची घटना घडली होती. त्याच अनुषंगाने खबरदारीचा उपाय म्हणून, कोरोना संक्रमण मोठ्या प्रमाणात होत असलेल्या भागातील  या माकडांना दिल्लीच्या वनविभागाने विलगीकरणात ठेवले होते.

संबंधित बातम्या