मॉन्सून पुन्हा सुपरफास्ट; गोव्यासह महाराष्ट्रात लवकरच एन्ट्री

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 4 जून 2021

दक्षिण केरळमध्ये मॉन्सून गुरुवारी दाखल झाला आहे.

दक्षिण केरळमध्ये मॉन्सून(Monsoon) गुरुवारी दाखल झाला आहे. आज दुसऱ्या दिवशी मॉन्सूनने पु्न्हा आपला वेग वाढवला असून केरळसह (Kerala) कर्नाटकच्या किनारपट्टीचा बहुतांश भाग, दक्षिण कर्नाटकचा अंतर्गतचा भाग, आंध्र प्रदेश तामिळनाडू तसेच बंगालच्या उपसागरतही धडक मारली आहे. अरबी समुद्रावर(Arabian Sea) येणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह जवळपास एका आठवड्यानंतर सक्रीय झाले. 

मॉन्सूनच्या वाटचालीसाठी पोषक हवामान असल्याने गोव्यासह,(Goa) कर्नाटक, महाराष्ट्राच्या काही भागामध्ये मॉन्सून लवकरच दाखल होणार आहे. संपूर्ण तामिळनाडू व्याप्त, तेलंगणा, आंध्र प्रदेश, ईशान्य भारताच्या काही भागामध्ये मॉन्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मॉन्सून म्हणजे काय? तो ओळखायचा कसा? जाणून घ्या...

यंदा मॉन्सून एक दिवस उशिराने अंदमान बेटावर दाखल झाल्यानंतर बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ''यास चक्रीवादळाने'' (yass cyclone) मॉन्सूनचा वेग काही काळ वाढला. केरळमध्ये मॉन्सून नियमित वेळेच्या आधी 31 मे रोजी दाखल होण्याची शक्यता असतानाच, मोसमी वाऱ्यांसाठी पोषक स्थिती नसल्यामुळे मॉन्सूनचे आगमन केरळमध्ये लांबले आहे.

संबंधित बातम्या