केरळात मॉन्सूनची ऐन्ट्री...

दैनिक गोमंतक
गुरुवार, 3 जून 2021

केरळ आणि आसपासच्या समुद्रात मान्सूनचे ढग गोळा झाले असून मॉन्सूनसाठी पोषक वातावरण झाले आहे. 

नवी दिल्ली : नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) (Monsoon) आज केरळमध्ये (Kerala) दाखल झाला आहे. या वेळी मान्सून केरळात नेहमीपेक्षा थोडा उशीरा पोहोचला आहे. केरळमध्ये मॉन्सूनच्या आगमनासाठी  परिस्थिती अनुकूल झाली आहे. हवामान खात्याच्या (IMD) संगण्यानुसार, केरळमध्ये मान्सूनसाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. केरळ आणि आसपासच्या समुद्रात मान्सूनचे ढग गोळा झाले असून मॉन्सूनसाठी पोषक वातावरण झाले आहे. 

6 गोव्यात तर 11 जूनला महाराष्ट्रात येणार 

काही दिवसांपूर्वी मॉन्सूची वाटचाल लांबली होती, त्यामुळे 1 जून रोजी केरळात दाखल होणारा मान्सूनला केरळात येण्यास दोन दिवस उशीर झाला. या आधी मान्सूचा अंदमानपर्यंतचा प्रवास खूप वेगात झाला त्यामुळे तो केरळात वेळेआधीच दाखल होणार असे चित्र होते. पण अंदमानापासून केरळापर्यंतच्या मान्सूनच्या प्रवासाला थोडा ब्रेक लागला होता. परंतु हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सूनने आज केरळात प्रवेश केला आहे. त्याचा प्रवास असाच राहिल्यास 6 जूनपर्यंत मान्सून गोव्यात दाखल होण्याचा अंदाज आहे. तर 11 जूनला महाराष्ट्र आणि तेलंगणात, 12 जूनला पश्चिम बंगाल, 13 ला ओडिसा व 14 जूनला झारखंडमध्ये मान्सून दस्तक देणार आहे. 

संबंधित बातम्या