मॉन्सूनच्या गतीला थोडासा ब्रेक, 3 जूनपर्यंत केरळात दाखल होण्याची शक्यता

दैनिक गोमंतक
रविवार, 30 मे 2021

मॉन्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याने दुसऱ्याच दिवशी अंदमान - निकोबारचे बोट व्यापत तो श्रीलंकेच्या किनाऱ्यावर दाखल झाला. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळामुळे मॉन्सूनला आणखीनच गती मिळाली.

नैऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) ला थोडासा ब्रेक (Brek) लागला आहे. वाऱ्यांचे प्रवाह सक्रिय नसल्याने तसेच पुरेसे बाष्प नसल्याने केरळपतील माॅन्सूनचे आगमन लांबले आहे. 3 जूनपर्यंत माॅन्सून (Monsoon) केरळात दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. 

मॉन्सून अंदमानात दाखल झाल्यानंतर त्याने दुसऱ्याच दिवशी अंदमान - निकोबारचे बोट व्यापत तो श्रीलंकेच्या किनाऱ्यावर दाखल झाला. त्याचवेळी बंगालच्या उपसागरात यास चक्रीवादळामुळे मॉन्सूनला आणखीनच गती मिळाली. 27 मे ला त्याने श्रीलंका (Sri Lanka), मालदीव आणि कोमोरीन समुद्र किनाऱ्याच्या काही भागात तो पोहोचला. मात्र त्यानंतर आजपर्यंत तो तेथेच आहे. 

CYCLONE YAAS: यास वादळाचे लाईव्ह लोकेशन पहा तुमच्या मोबाईलवर

यंदा मॉन्सून  1 जूनच्या आधीच केरळात दाखल होणार असा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला होता. परंतु आता 1 जून नंतर नैऋत्येकडून येणाऱ्या वाऱ्यांचा प्रवाह सक्रिय होण्याचा अंदाज आहे. त्यानंतर तो साधारणतः 3 जूनपर्यंत केरळात दाखल होईल अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. यंदा मॉन्सून सर्वसाधारणपणे 98 टक्के होऊ शकतो. तर महाराष्टातील अनेक भागात तो सरासरीच्यावर पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 

संबंधित बातम्या