Monsoon: मान्सून अंदमानात आला रे...

दैनिक गोमंतक
शुक्रवार, 21 मे 2021

बंगालच्या उपसागराच्या (Bay of Bengal) काही भागावर,  दक्षिण अंदमान समुद्र, उत्तर अंदमान बेटे आणि निकोबार (Nocobar) बेटांपर्यंत मजल मारली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहिती नुसार  मान्सून (Monsoon)  (नैर्ऋत्य मोसमी वारे) आज अंदमान (Andman)भागात दाखल झाला आहे. बंगाल उपसागराच्या (Bay of Bengal) काही भागावर,  दक्षिण अंदमान समुद्र, उत्तर अंदमान बेटे आणि निकोबार (Nocobar) बेटांपर्यंत मजल मारली आहे. काही दिवसांपासून बंगालच्या उपसागरात सुरु असलेल्या हालचालींमुळे वाऱ्याची गती वाढणार आहे आणि त्याचाच परिणाम मान्सून वर होत असल्याचा अंदाज वर्तवला गेला आहे.  (Monsoon reaches Andaman)

Monsoon: मान्सून 27 मे ला केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता

ढगांच्या दाटीसह जोरदार पावसाची हजेरी आणि  नैर्ऋत्येकडून येणारे वारे यामुळे मान्सून आज अंदमानात दाखल झाला आहे. तसेच बंगालच्या उपसागरात उद्या कमी दाबाचा पत्ता निर्माण होणार असून,  दाबाच्या  पट्ट्यामुळे मोठे चक्रीवादळ देखील येऊ शकते. या चक्रीवादळाचा परिणाम ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागांवर धडकणार असल्याची शक्यता आहे. 

दरवर्षी 18 ते 20 मे पर्यंत अंदमान बेटांवर मान्सून दाखल होत असतो, मात्र यावर्षी बंगालच्या उपसागरात मोठ्या प्रमाणात हालचाली सुरु असल्याने वाऱ्याच्या गतीवर त्याचा परिणाम झाला होता. तर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने यास नावाचे चक्रीवादळ येणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. त्या अनुशंघाने किनारपट्टी भागातील लोकांना देण्यात आलं आहे. 

 

 

संबंधित बातम्या