Monsoon Update: उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद

हवामान खात्याच्या (IMD) मते, गुजरातमध्ये (Gujarat) पुढील 48 तास सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या भागात मुसळधार पाऊस पडेल.
Monsoon Update: उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद
मुसळधार पावसामुळे (Rain) येथे दरड कोसळल्याने अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. Dainik Gomantak

उत्तराखंडमध्ये (Uttarakhand) पावसानंतर भूस्खलनामुळे (landslide) राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद (road closed) झाले आहेत. ऋषिकेशमधील (Rishikesh) बद्रीनाथ महामार्गावरील सिरोबगडमध्ये निसर्ग कहर करीत आहे. मुसळधार पावसामुळे (Rain) येथे दरड कोसळल्याने अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. भूस्खलनानंतर अनेक वाहने महामार्गाच्या बाजूला अडकली आहेत.

मुसळधार पावसामुळे (Rain) येथे दरड कोसळल्याने अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उत्तराखंड दुर्घटना: अमेरिकेच्या वैज्ञानिकांनी सांगितले उत्तराखंड दुर्घटनेचे खरे कारण

रुद्रप्रयाग जिल्ह्यातील सिरोबागड आणि नरकोटा भागात गुरुवारी मुसळधार पावसामुळे महामार्ग बंद करण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये सलग तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे, त्यानंतर भूस्खलनाच्या शक्यतेमुळे अनेक ठिकाणी महामार्ग बंद करण्यात आले आहेत.

सध्या देशाच्या अनेक भागात अजूनही पावसाची शक्यता आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार, आजही देशाच्या अनेक भागात पावसाची शक्यता आहे. पुढील २४ तासांत मुरादाबाद, रामपूर, अमरोहा (यूपी) नरवाना, बरवाला, रेवाडी, बावल (हरियाणा) परिसरात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.

मुसळधार पावसामुळे (Rain) येथे दरड कोसळल्याने अनेक वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
उत्तराखंड दुर्घटना : ऋषिगंगा जलविद्युत प्रकल्पाचे मोठे नुकसान; दीडशे लोक बेपत्ता असण्याची शक्यता 

यूपी, मध्य प्रदेशात पावसाची शक्यता

हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, मध्य प्रदेश आणि लगतच्या पूर्व राजस्थानात चक्रीवादळ फैलाव कायम आहे. त्यामुळे भावनगर, राजकोट, सौराष्ट्र, गोंडल, गुजरात येथे मुसळधार पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. सौराष्ट्राची जीवनरेखा असलेल्या शेत्रुंजी धरण रात्री उशिरा ओव्हरफ्लो झाले. यामुळे आज सकाळी धरणाचे 59 दरवाजे 2 फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. धरणाच्या ओव्हरफ्लोमुळे किनारी भागात राहणाऱ्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर सखल भागातील 17 गावांमध्येही अलर्ट जारी करण्यात आला आहे.

त्याचबरोबर राजकोट जिल्ह्यातही पाऊस सुरू आहे. यामुळे राजकोटच्या गोंडल नदीमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. हवामान खात्याच्या मते, गुजरातमध्ये पुढील 48 तास सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या भागात मुसळधार पाऊस पडेल.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com