Monsoon Update: पुढील चार दिवसात या 9 राज्यांत मुसळधार पाऊस
Monsoon Update: Meteorological Department alert heavy rain in this 9 statesDainik Gomantak

Monsoon Update: पुढील चार दिवसात या 9 राज्यांत मुसळधार पाऊस

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार (Monsoon Update), पुढील चार दिवसांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दिल्ली एनसीआरसह (Delhi NCR) देशाच्या अनेक भागात तीव्र पावसाची शक्यता (Heavy Rain) वर्तवली जात आहे.काहीदिवसांपासून सतत पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात सामान्य नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मुसळधार पावसामुळे, ज्या भागात पाणी साचण्याची परिस्थिती आहे, त्या जागी लोकांना घराबाहेर पडताना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे.(Monsoon Update: Meteorological Department alert heavy rain in this 9 states)

हवामान विभागाने (Meteorological Department) दिलेल्या माहितीनुसार (Monsoon Update), पुढील चार दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र (Maharashtra), कोकण आणि गोवा (Konkan & Goa), मध्य प्रदेश (Madhya Pradesh), विदर्भ, गुजरात(Gujarat), पूर्व राजस्थान (Rajasthan), छत्तीसगड (Chhattisgarh) आणि ओडिशामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.हवामान खात्याच्या अंदाजानुसार सोमवारी आणि मंगळवारी ओडिशा, गुजरात आणि मध्य महाराष्ट्र आणि कोकण वगळता गोव्यात वेगवेगळ्या ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Monsoon Update: Meteorological Department alert heavy rain in this 9 states
राज्यात 4 दिवस मुसळधार पावसाचा इशारा: या जिल्ह्याना अलर्ट!

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवसांत देशभरात मुसळधार पाऊस दिसू शकतो. हवामान विभागाने पुढील 4 दिवसांमध्ये किनारपट्टी कर्नाटकच्या भागात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. 13 तारखेला किनारपट्टी आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये आणि 15 सप्टेंबरपर्यंत केरळमध्ये पावसाची शक्यता आहे.

हवामान खात्याच्या मते, दिल्ली एनसीआर व्यतिरिक्त आज पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, डोंगराळ राज्य उत्तराखंड, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, राजस्थान आणि गुजरातचा पूर्व भाग आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर आज पाऊस असणार आहे.

Monsoon Update: Meteorological Department alert heavy rain in this 9 states
Monsoon Update: उत्तराखंडमध्ये भूस्खलनामुळे राष्ट्रीय महामार्गासह अनेक रस्ते बंद

तर फक्त महाराष्ष्ट्र राज्याचा विचार करता हवामान विभागाने (Meteorological Department)पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर वेगाने वारे वाहणार आहे. तसेच राज्यात विविध ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे असा, अंदाज वर्तवला आहे. बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र आज तीव्र झाले आहे. पुढील 24 तासात ते आणखी तीव्र होण्याची शक्यताही आहे. अशी शक्यता IMD ने वर्तवली आहे.

त्याचबरोबर हवामान खात्याने आजसाठी पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा आणि कोल्हापूरला ऑरेंज अ‌ॅलर्ट जारी केला आहे. तर, मुंबई, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, वाशिम, बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वर्धा, नागपूर, अमरावती, आणि गोंदिया, भंडारा, गडचिरोली जिल्ह्यांना यलो अ‌ॅलर्ट देण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com