Monsoon Update: पूर्व विदर्भातून माॅन्सून परतला

देशामध्ये (India) आणखी काही भागामधून वारे परतण्यासाठी पोषक हवामान (Weather) आहे.
Monsoon Update: पूर्व विदर्भातून माॅन्सून परतला
मॉन्सूनची वाटचालDainik Gomantak

राजस्थान (Rajasthan) मधून 6 ऑक्टोबर रोजी मॉन्सूनच्या परतीची वाटचाल सुरू झाली आहे. अश्यातच नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा, मॉन्सून परतीचा प्रवास वेगाने सुरू झाला आहे. सोमवारी देशातील पूर्व विदर्भात गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही भागात मॉन्सूनने आपला काढता पाय घेतला असून हवामान खात्याने असे स्पष्ट केले आहे.

येत्या बुधवारी पश्चिम राजस्थान, गुजरात लगतच्या राज्याच्या (State) काही भागामध्ये मॉन्सूनने परतला होता. त्यानंतर दोनच दिवसात वायव्य भारतातून मॉन्सून परतला. शनिवारी मॉन्सूनने उत्तर भारतातून निरोप घेतला होता. सोमवारी झारखंड, बिहारसह मध्य प्रदेश, छत्तीसगडच्या काही भागासह, महाराष्ट्र, ओडिशा, पश्चिम बंगालच्या काही भागातून मॉन्सूनने हजेरी लावली.

मॉन्सूनची वाटचाल
Monsoon Update: देशातून मॉन्सूनच्या एग्झिटला सुरुवात

हिरवी रेषा मॉन्सूनच्या परतीची वाटचाल दाखवते:

मॉन्सूनच्या परतीची सीमा सिलीगुडी, मालदा, शांतीनिकेतन, मिदनापूर, बारीपाडा, चिंचवाडा, इंदोर, गांधीनगर, राजकोट, पोरबंदर होती. देशामध्ये आणखी काही भागामधून वारे परतण्यासाठी पोषक हवामान आहे. येत्या बुधवारपर्यंत मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगालचा बहुतांश भाग, गुजरात, महाराष्ट्र, ओडिशाचा आणखी काही भाग, तसेच ईशान्य भारताच्या काही भागातून मॉन्सून परतण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com