मार्च महिन्याने मोडले गेल्या 121 वर्षातील उष्णतेचे रेकॉर्ड;  32.65 डिग्री कमाल तापमानाची नोंद  

दैनिक गोमंतक
मंगळवार, 6 एप्रिल 2021

भारतीय हवामान खात्याने यंदाचा मार्च 2021 हा महिना गेल्या 121 वर्षातील सर्वाधिक उष्ण महिना असल्याची नोंद केली आहे.

भारतीय हवामान खात्याने यंदाचा मार्च 2021 हा महिना गेल्या 121 वर्षातील सर्वाधिक उष्ण महिना असल्याची नोंद केली आहे. 1981 ते 2010 या कालावधीत देशातील तापमान  कमाल 31.24 डिग्री, किमान 18.87 डिग्री आणि सरासरी तापमान 25.06 डिग्री इतके नोंदविण्यात आले होते, त्या तुलनेत गेल्या महिन्यात याच तापमानात वाढ झाल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. मार्च 2021 या महिन्यात कमाल तापमान 32.65 डिग्री सेल्सियस, किमान तापमान 19.95 डिग्री सेल्सियस  सरासरी तापमान 26.30 डिग्री सेल्सियस इतके नोंदविण्यात आले आहे. 

भारतातील मार्च २०२१ या महिन्यात गेल्या 11 वर्षातील सर्वाधिक कमाल तापमान म्हणजे 32.65 डिग्री इतके नोंदविण्यात आले. विशेष म्हणजे मार्च 2021 हा महिना गेल्या 121 वर्षातील सर्वाधिक गरम महिना असल्याचेही  हवामान खात्याने म्हटले आहे. यापूर्वी 2010 मध्ये 33.09 डिग्री आणि 2004 मध्ये हे तापमान 32.82 अंश सेल्सिअस होते. 

चार राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात आज मतदानाला सुरुवात

'मार्च महिन्यात तापमान 40 अंशांपेक्षा जास्त तापमानची नोंद 
तसेच, मध्यम आणि किमान तापमानाच्या संदर्भात जानेवारी आणि फेब्रुवारी हा १२१ वर्षातील तिसरा आणि दुसरा सर्वात उन्हाळा महिना होता. मार्चमध्ये देशातील बर्‍याच भागात तापमान 40 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान होते. 29 ते 31 मार्च दरम्यान अनेक ठिकाणी उष्णतेची लाट होती तर पश्चिम राजस्थानमध्ये बऱ्याच ठिकाणी 'तीव्र उष्णतेची' स्थिती होती, अशी माहिती हवामान खात्याने दिली आहे. 

लॉकडाऊनबद्दल सोशल मीडियावर चुकीची माहिती प्रसारित करणं 'सीएला भोवल'

'बर्‍याच ठिकाणांवरून उष्माघाताच्या लाटेची सूचना 
हवामान खात्याच्या वतीने 30 आणि 31 मार्च रोजी पूर्व राजस्थान, तर 31 मार्च रोजी किनारी आंध्र प्रदेश, तमिळनाडूमधील ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील  गंगेच्या मैदानामधील काही ठिकाणाहून उष्माघाताची नोंद झाली आहे. याशिवाय ओडिसातील बारीपाडा याठिकाणी कमाल तपमान 44.6 अंश सेल्सिअस नोंदविण्यात आल्याची माहितीही हवामान खात्याने नोंदविली आहे. 

संबंधित बातम्या