भारतीय पुरातत्व विभागाची स्मारके 6 जुलैपासून होणार खुली

PIB
शनिवार, 4 जुलै 2020

राज्य आणि / किंवा जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही विशिष्ट आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.

नवी दिल्‍ली,  

संस्कृती मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभाग (एएसआय) यांनी सुरक्षा प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत 6 जुलै 2020 पासून सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके उघडण्याचा निर्णय घेतला आहे, असे केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), प्रल्हाद सिंह पटेल यांनी जाहीर केले. ते म्हणाले की, केवळ बिगैर-प्रतिबंधित क्षेत्रातील स्मारके/संग्रहालये पर्यटकांसाठी खुली असतील. सर्व केंद्रीय संरक्षित स्मारके आणि स्थळांना गृह मंत्रालय आणि आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या स्वच्छता, शारीरिक अंतर आणि इतर आरोग्य मार्गदर्शक तत्वांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असेल. राज्य आणि / किंवा जिल्हा प्रशासनाच्या कोणत्याही विशिष्ट आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल, असेही ते म्हणाले.

कोविड-19 साथीच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर ही स्मारके बंद करण्यात आली होती. एकूण 3691 केंद्रीय संरक्षित स्मारके एएसआय अंतर्गत येतात, त्यापैकी प्रार्थनास्थळे असलेली एएसआयची 820 केंद्रीय संरक्षित स्मारके 8 जून 2020 पासूनच सुरु करण्यात आली आहेत 

संबंधित बातम्या