दोन जिल्ह्यांत 600 पेक्षा जास्त मुलं पॉझिटिव्ह; तिसरी लाट असल्याची भीती...

दैनिक गोमंतक
सोमवार, 24 मे 2021

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Covid-19 Second Wave) कहर सध्या देशात सुरु असून, लाखो लोकांचे मृत्यू होत असल्याचे दिसते आहे. त्यातच आता तिसरी लाट येण्याची भीती आहे. तिसऱ्या लाटेमध्ये (Covid-19 Third Wave)कोरोना विषाणू हा लहान मुलांना जास्त धोकादायक ठरण्याचा अंदाज तज्ञांनी वर्तवला असतानाच, राजस्थानमध्ये घडलेल्या एका घटनेमुळे चिंता अजूनच वाढलेली आहे. राजस्थानच्या डुंगरपूर  (Dungarpur) आणि दौसा जिल्ह्यात (Dausa District) मागच्या काही दिवसांत 600 पेक्षा जास्त मुलांना कोरोना संसर्ग  समोर आले आहे. त्यामुळे या घटनेकडे तिसऱ्या लाटेचे संकेत म्हणून पाहिले जाते आहे. (More than 600 children in Dungarpur and Dausa in Rajasthan tested positive for corona)

राजस्थानच्या (Rajasthan) दौसा जिल्ह्यात 341 मुलांना कोरोना संक्रमण झाल्याचे समजते आहे. यामध्ये बहुतांश मूल ही 18 वर्षापेक्षा कमी वयाची आहे. हे सर्व मुलं 1  मे नंतर कोरोना संक्रमित झाले असून यांच्यातील जवळपास सर्वांचीच प्रकृती अद्यापपर्यंत स्थिर असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत. तरी तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा रुग्णालयाला सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहे. 

हे टाटाच करू शकतात! कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्यास कुटुंबियांना मिळणार 60 वर्ष...

तिसऱ्या लाटेच्या अनुशंघाने मुलांच्या तसेच नवजात शिशूंच्या संरक्षणासाठी सर्व राज्यांनी आपली तयारी वाढवण्याच्या सूचना  देशातील सर्वोच्च बाल हक्क संस्था असलेल्या राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने दिल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांना लिहिलेल्या पात्रात राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाच्या अध्यक्ष प्रियांक कानुनगो यांनी कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेचा मुलांवर परिणाम होण्याच्या शक्यता आहेत.

त्या अनुशंघाने नॅशनल इमरजेंसी ट्रान्सपोर्ट सर्व्हिसची तातडीने पुनर्रचना करण्याची गरज असल्याचे म्हणत, लहान मूळ आणि नवजात शिशूंसाठी रुग्णवाहिकांना निर्देश देण्यात यावे अशी विनंती देखील प्रियांक कानुनगो यांनी आरोग्य मंत्रालयाला केली आहे. 

संबंधित बातम्या