यंदा मागील वर्षीपेक्षा अधिक गहू खरेदी 

Dainik Gomantak
शनिवार, 30 मे 2020

कोरोनामुळे खरेदीत अडथळा येत असला तरी मागील वर्षीपेक्षा या वर्षी 25 हजार टन अधिक गव्हाची खरेदी करण्यात आली आहे.

मुंबई

 या वर्षीच्या हंगामात देशभरात 341.56 लाख टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. जी मागील वर्षी याच कालावधीत 341.31 लाख टन इतकी करण्यात आली होती. कोरोनामुळे खरेदीत अडथळा येत असला तरी मागील वर्षीपेक्षा या वर्षी 25 हजार टन अधिक गव्हाची खरेदी करण्यात आली आहे, अशी माहिती भारतीय अन्नधान्य महामंडळाकडून (एफसीआय) देण्यात आली आहे. यामध्ये पंजाबमध्ये सर्वाधिक 125.84 लाख टन विक्रमी गहू खरेदी करण्यात आली आहे. याशिवाय मध्य प्रदेशमध्ये 113.38 लाख टन, हरियाणात 70.65 लाख टन, उत्तर प्रदेशात 20.39 लाख टन, राजस्थानात 10.63 लाख टन, उत्तराखंड 0.31 लाख टन, गुजरातमध्ये 0.21 लाख टन, चंदीगढमध्ये 0.12 लाख टन, तर हिमाचल प्रदेशात 0.03 लाख टन गव्हाची खरेदी करण्यात आली आहे. ऐन गहू खरेदीच्या काळात कोरोनाचा प्रसार आणि देशभरातील लॉकडाऊनमुळे शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे निर्माण होत होते. मात्र, देशभर जनजागृती करत, सोशल डिस्टन्स पाळत आणि विविध पद्धतीने काळजी घेत ही गहू खरेदी करण्यात आली, असेही एफसीआयकडून सांगण्यात आले.

संबंधित बातम्या