पुरुषांपेक्षा महिलांची संख्येत झाली वाढ;केंद्रीय आरोग्य मंत्रालय

कुटुंब नियोजन (Family planning) कार्यक्रमाला मोठे यश येत आहे. 1 हजार पुरुषामागे 1020 महिला ही आकडेवारी समोर आली आहे.
पुरुषांपेक्षा महिलांची संख्येत झाली वाढ;केंद्रीय आरोग्य मंत्रालय
महिलांच्या संख्येत झालेली वाढ Dainik Gomantak

देशात महिला आणि पुरुषांच्या लिंग गुणोत्तर (Gender ratio) बाबत मोठी गोष्ट समोर आली आहे. देशात प्रथमच महिलांच्या संख्येत वाढ होऊन ती पुरुषांपेक्षा जास्त झाली आहे. 1990 च्या दरम्यान एक हजार पुरुषांमागे 927 महिलांचे प्रमाण होते. ताज्या आकडेवारीनुसार एक हजार पुरुषांमागे देशात सुमारे 1020 महिलांची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने (Union Health Ministry) ही आकडेवारी जाहीर केली आहे.

भारतातील महिलांच्या (women) संख्येत सातत्याने वाढत होत आहे. 2015-16 साली 919 वरून 2019-20 साली 929 इतकी झाली होती. राज्य आणि केंद्रशासित (State and Union) प्रदेशातील लोकसंख्या,प्रजनन दर आणि बाल स्वास्थ्य, परिवार कल्याण, पोषण आणि इतर आरोग्यविषयी (health) क्षेत्रातील सर्व्हे जाहीर केला आहे.

महिलांच्या संख्येत झालेली वाढ
नवज्योत सिद्धूंनी दिली उपोषणाची धमकी...

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, NFHS-5 च्या सर्व्हेनुसार 88.6% मुलांचा जन्म हा रुग्णालयात झाला. तसेच NFHS-4 (78.9%) च्या तुलनेमध्ये ही मोठी सुधारणा झालेली आहे. भारत हॉस्पिटलॉइज्ड बर्थमध्ये युनिव्हर्सल स्टेजच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. प्रजननाचा दर काही प्रमाणात घटल्याने लोकसंख्या स्थिर होत आहे असे यातून दिसून हायेत आहे. नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हेनुसार शहरी भागात प्रजननाच दर हा 1.6 टक्के आहे तर ग्रामीण भागात तो 2.1 टक्के आहे. यामुळे भारताच्या कुटुंब नियोजन कार्यक्रमाला मोठे यश येत आहे. 2015-16 मध्ये प्रति महिला मुलांचे प्रमाण सरासरी 2.2 होते. ते कमी होऊन आता 2 झाले आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com