Karnataka: मशिदीसारख्या दिसणाऱ्या कर्नाटकमधील 'त्या' बसस्थानकाचे अखेर रूपडं पालटले

स्थानिक भाजप आमदारानेच बांधले होते बसस्थानक
Karnataka Mosque Bus Stop
Karnataka Mosque Bus StopDainik Gomantak

Karnataka Mosque Bus Stop: काही दिवसांपूर्वी कर्नाटकातील म्हैसूर येथील बसस्थानकाचे छायाचित्र इंटरनेटवर व्हायरल झाला होता. बसस्थानकावर तीन घुमट बांधण्यात आले होते, जे 'मशिदीसारखे' दिसत होते. त्यानंतर एका, भाजप खासदाराने बसस्थानक पाडण्याची धमकी दिली होती. त्यानंतर या बसस्थानकाचे नवे रूप समोर आले आहे.

Karnataka Mosque Bus Stop
Sambhaji Chhatrapati:...तर उठाव होणारच, संभाजीराजेंनी दिला राज्यपाल हटाओचा नारा

भाजप खासदार प्रताप सिम्हा यांनी हे बसस्थानक पडण्याची धमकी दिली होती. "बसस्थानकाला तीन घुमट आहेत, मध्यभागी एक मोठा आणि त्याच्या पुढे दोन लहान घुमट आहेत. ती फक्त एक मशीद आहे. मी अभियंत्यांना तीन-चार दिवसांत हे बांधकाम पाडण्यास सांगितले आहे. त्यांनी पाडले नाही, तर मी जेसीबी घेऊन ते पाडून टाकणार." अशी धमकी त्यांनी दिली होती.

दरम्यान, या बसस्थानकाचे नवे रूप समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्ग-766 च्या केरळ बॉर्डर-कोलेगला सेक्शनवर असलेल्या या बसस्थानकावर सुरूवातीला तीन घुमट होते, सध्या या बसस्थानकावर फक्त एकच घुमट आहे. तसेच, त्याला लाल रंग देण्यात आला आहे.

Karnataka Mosque Bus Stop
Asha Parekh At Iffi: प्यार दिवाना होता है...70 च्या दशकातील हिट गर्ल आशा पारेख इफ्फीत

स्थानिक भाजप आमदारानेच बांधले होते बसस्थानक

स्थानिक भाजप आमदार राम दास, यांनीच हे बसस्थानक बांधले होते. आमदार राम दास यांनी सर्व टीका आणि विरोधाचे खंडण करत, हे बसस्थानकाची रचना म्हैसूर पॅलेसपासून प्रेरित असल्याचे सांगितले. तसेच, आमदार राम दास यांनी बसस्थानकावरून झालेल्या टीकेनंतर माफी देखील मागितली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com