Corona Update : नवीन वर्षात पहिल्यांदाच आढळले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 1 एप्रिल 2021

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाची नवी प्रकरणे पुन्हा वाढतच चालल्याचे दिसून येत आहे.

देशात मागील काही दिवसांपासून कोरोनाची नवी प्रकरणे पुन्हा वाढतच चालल्याचे दिसून येत आहे. देशात मागील वर्षाच्या 11 ऑक्टोबरनंतर प्रथमच कोरोनाची नवी प्रकरणांची संख्या 72,330 नोंदली गेली आहेत. त्याशिवाय नवीन वर्षात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणावर कोरोनाचे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 1,22,21,665 वर पोहचली आहे. तर मागील वर्षाच्या 11 ऑक्टोबर रोजी देशात कोरोनाचे 74,383 रुग्ण आढळले होते. 

1 एप्रिल पासून चारचाकी वाहनांसाठी केंद्र सरकारचा नवीन नियम; जाणून घ्या

आरोग्य मंत्रालयाने आज जारी केलेल्या आकडेवारीनुसार मागील चोवीस तासात कोरोनामुळे 459 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे आतापर्यंत देशात 1,62,927 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. याशिवाय, सलग 22 व्या दिवशी कोरोनाचा संसर्ग होण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. तसेच यामुळे देशातील सक्रिय प्रकरणांची संख्या 5,84,055 वर पोहचली आहे. हा दर एकूण संक्रमणाच्या 4.78 टक्के आहे. तर कोरोनाच्या संसर्गानंतर बरे होण्याचा दर 93.89 टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. आणि आतापर्यंत 1,14,74,683 जण कोरोनाच्या विळख्यातून ठीक-ठाक बरे झाले आहेत. व यासह मृत्यू दर 1.33 टक्क्यांवर गेला आहे. 

लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

देशात 7 ऑगस्ट रोजी कोरोनाच्या रुग्णांची संख्या वीस लाखांवर पोहचली होती. त्यानंतर 16 सप्टेंबरला हा आकडा पन्नास लाखांवर पोहचला होता. तर 19 डिसेंबर रोजी कोरोना संक्रमितांचा आकडा एक कोटीवर पोहचला होता. आयसीएमआरनुसार 31 मार्चपर्यंत देशात 24,47,98,621 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. आणि काल बुधवारी एका दिवशी 11,25,681 नमुन्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली. तसेच, मागील चोवीस तासांत मृत्यू झालेल्या 459 लोकांपैकी 227 एकटे महाराष्ट्रातील आहेत. त्यानंतर पंजाबमध्ये 55, छत्तीसगडमध्ये 39, कर्नाटकमध्ये 26, तामिळनाडूमध्ये 19, केरळमध्ये 15 आणि दिल्ली आणि उत्तर प्रदेशात प्रत्येकी 11-11 जणांचा कोरोनामुळे जीव गेलेला आहे. 

 

संबंधित बातम्या