जन्मदाती आईच बनली वैरी! अल्पवयीन मुलीचा अवयव विकण्यास पाडले भाग

जूनमध्ये पोलिसांनी पीडितेची आई आणि सावत्र वडिलांना तिची अंडपेशी विकण्यासाठी खासगी प्रजनन केंद्रात नेल्याप्रकरणी अटक केली होती.
Crime News
Crime NewsDainik Gomantak

चेन्नई: तामिळनाडूच्या इरोड जिल्ह्यात एका 16 वर्षीय मुलीने सरकारी बालगृहात आत्महत्येची धमकी दिली आहे, असे पोलिसांनी सांगितले. मुलीला तिची आई आणि सावत्र वडिलांनी खाजगी प्रजनन रुग्णालयात नेले आणि तिची अंडपेशी विकण्यास भाग पाडले. स्थानिक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला तिच्या नातेवाईकांकडे घरी परतायचे होते. मात्र प्रकरणाची चौकशी सुरू असल्याने त्यांची विनंती फेटाळण्यात आली.

(mother forced the sale of the minor girl's organs)

Crime News
उदयपूर, अमरावती नंतर अयोध्येत हनुमान मंदिर परिसरात गळा कापून तरूणाची हत्या

हिंदुस्तान टाईम्समधील एका बातमीनुसार, पोलिसांनी मात्र त्याने क्लिनिंग लिक्विड प्यायल्याचा वृत्त फेटाळून लावला आहे. याआधी मुलीने लायसोल प्यायल्याचे सांगून सर्वांना घाबरवले. नंतर तीला ताबडतोब रुग्णालयात नेण्यात आले दरम्यान, तिने काहीही प्यालेले नव्हते असे आढळून आले. तरीही पोलिसांनी तीच्यावर पाळत ठेवली आहे. इरोड येथील या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आता मुलीचे समुपदेशन केले जात आहे. मुलीने सांगितले की तिला तिच्या आजी किंवा मावशी आणि काकांकडे जायचे आहे. ते बाल केंद्रात येतात आणि तिला भेटतात, पण त्यांनाही मुले आहेत म्हणून त्यांना तिला घरी घेऊन जायचे नाही.

Crime News
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज आंध्र प्रदेश दौरा

जूनमध्ये, पोलिसांनी पीडितेच्या आई आणि सावत्र वडिलांना तिची अंडपेशी विकण्यासाठी खाजगी प्रजनन केंद्रात नेल्याबद्दल अटक केली. मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, 2017 पासून तिच्यावर आठ वेळा जबरदस्ती करण्यात आली. त्याची आई आणि सावत्र वडील यासाठी प्रत्येक वेळी 20 हजार रुपये घेत असत. एका महिला मध्यस्थीला देखील कमिशन म्हणून ₹ 5000 मिळाले. तर दुसऱ्या व्यक्तीने मुलीचे नाव आणि जन्मतारीख बदलण्यासाठी बनावट आधार कार्ड बनवले होते. या दोघांनाही अटक करण्यात आली. तक्रारीनुसार, पीडितेचा सावत्र बाप तिच्यावर पाच वर्षांहून अधिक काळ लैंगिक अत्याचार करत होता. पोलिसांनी सावत्र वडील आणि आईविरुद्ध वारंवार लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com