Gujarat: आईच बनली राक्षस, तीन महिन्यांच्या चिमुरडीला तिसऱ्या मजल्यावरुन दिले फेकून

Gujarat Crime: गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीला हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले.
 Girl
GirlDainik Gomantak

Gujarat Crime: गुजरातमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका महिलेने आपल्या तीन महिन्यांच्या चिमुरडीला हॉस्पिटलच्या तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. तिसऱ्या मजल्यावरुन खाली पडल्याने निष्पाप चिमुरडीचा मृत्यू झाला. 23 वर्षीय महिलेला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे 1 जानेवारीची आहे. गुजरातमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आईने ही घटना घडवून आणली.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, मुलीला तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकणारी महिला ही आणंदमधील पेटलाड येथील रहिवासी आहे. फरझानबानू मलेक असे या महिलेचे नाव आहे. महिलेने पोलिसांना सांगितले की, माझी तीन महिन्यांची मुलगी (Girl) अमरीनबानू जन्मापासूनच आजारी होती. ती खूप आजारी असायची. मी तिला दुःखात पाहू शकत नव्हते. त्यामुळेच मी हे पाऊल उचलले. आईच्या या निर्दयतेची कहाणी ऐकून सगळेच आश्चर्यचकित झाले.

 Girl
Gujarat Accident News: गुजरातमधील नवसारी येथे लक्झरी बस अन् कारचा भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू

दुसरीकडे, एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, तीन महिन्यांच्या मुलीला दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मुलीच्या आईने सुरुवातीला दावा केला होता की, तिचे मूल रुग्णालयातून बेपत्ता झाले आहे. यानंतर रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात आले. फुटेजमध्ये ती आपल्या मुलीसोबत गॅलरीत फिरताना आणि नंतर रिकाम्या हाताने परत येताना दिसत आहे. यानंतर पोलिसांना आरोपी आईवर संशय आला. चौकशीत आईने गुन्ह्याची कबुली दिली.

पोलिसांनी सांगितले की, एफआयआरनुसार मुलगी जन्माला आल्यानंतर आजारी पडली. वडोदरा येथील एसएसजी रुग्णालयात तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मुलीचे वडील आसिफ यांनी सांगितले की, रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले की, मुलगी खराब पाणी पिल्याने आजारी पडली होती.

 Girl
Gujarat New CM: भूपेंद्र पटेल यांच्याकडे पुन्हा गुजरातची कमान, UCC वर दिले 'हे' मोठे वक्तव्य

तसेच, या तीन महिन्यांच्या मुलीला 14 डिसेंबर रोजी नडियाद येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. 1 जानेवारी रोजी मुलीच्या आईने ती बेपत्ता असल्याचा दावा केला होता. यानंतर मुलीच्या वडिलांनी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना मुलीचा मृतदेह तळमजल्यावर आढळून आला. पोलिसांना याबाबत माहिती दिली. सीसीटीव्ही फुटेज तपासले असता समोर आलेल्या सत्यावर कोणाचाही विश्वास बसत नव्हता. आईनेच आपल्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरुन खाली फेकले. आईने गुन्ह्याची कबुली दिली असून माझ्या मुलीला खूप वेदना होत असल्याचे तिने सांगितले. तिचे दुखणे मला बघवत नव्हते म्हणून मी हे पाऊल उचलले, असेही आरोपी महिलेने पोलिसांना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com