आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह; पण नवजात मुलीचा पॉझिटिव्ह

गोमंन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 28 मे 2021

वाराणसीमधील बनारस हिंदू विद्यापीठातील सर सुंदर लाल रुग्णालयामध्ये जन्माला आलेल्या मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.

देशात कोरोनाचा संसर्ग (Corona Second Wave) पुन्हा एकदा वाढू लागला असताना कोरोनाची दुसरी लाट अधिक घातक ठरली आहे. या लाटेदरम्यान अनेक डॉक्टरांनी आश्चर्चचकीत करणारी प्रकरणे समोर आणली आहेत. असच एक धक्कादायक प्रकरण वाराणसीमधील बनारस हिंदू विद्यापीठातील (Banaras Hindu University) सर सुंदर लाल रुग्णालयामधून समोर आलं आहे. जन्माला आलेल्या मुलीचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह(corona report positive) आला आहे. विशेष म्हणजे या गोंडस मुलीला जन्म देणाऱ्या आईचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला. हे प्रकरण दुर्मिळ असल्याचं मानल जात असून बाळाचा रिपोर्ट पाहून डॉक्टरही (Doctor) चक्रावले आहेत. मात्र बनारस हिंदू विद्यापीठातील वैद्यकीय अधिकक्षांनी असं काही वेळा होऊ शकतं अस सांगत बाळाची पुन्हा कोरोनाची चाचणी करण्याची शक्यता बोलून दाखवली आहे. रुग्णालयातील रजिस्टारनेही तान्ह्या बाळाचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. (Mothers corona report negative But the newborn girl is positive)

वाराणसीमधील कॅनटॉनमेंट परिसरात राहणाऱ्या 32 वर्षीय अनिल प्रजापत यांच्या 26 वर्षीय गरोदर पत्नीवर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. 25 मे रोजी प्रजापत यांच्या पत्नीवर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शस्त्रक्रिया करण्याआधी या महिलेची कोरोना चाचणी करण्यात आली होती. अनिल यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या पत्नीचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच दिवशी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अखेर अनिल यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला. नव्या नियामानुसार या बाळाचा जन्म झाल्यानंतर त्याची कोरोना चाचणी करण्यासाठी सॅम्पल घेऊन पाठवण्यात आले. त्याच दिवशी बाळाचा कोरोना रिपोर्टचा निकाल आल्याने रुग्णालयातील कर्मचारीही चक्रावले आहेत. मात्र बाळाची तब्येत ठणठणीत आहे. मात्र अनिल यांनी कोरोनाची चाचणी करताना काहीतरी गोंधळ झाल्याची शक्यता वर्तवली आहे.

coronavirus: गरोदर असताना कोरोना रुग्णांची सेवा करणाऱ्या नर्सचा मृत्यू

दुसरीकडे, याचसंदर्भात बोलताना रुग्णालयातील अधिक्षक के.के गुप्ता (K.K Gupta) यांनी असं घडणं  काही विशेष गोष्ट नसल्याचं म्हटलं आहे. आरटी-पीसीर चाचणीची सेन्सिटिव्हीटी 70 टक्क्यापर्यंत असते. त्यामुळे खात्रीसाठी बाळाची कोरोना चाचणी पुन्हा एकदा केली जाईल असं म्हटलं आहे. गरज पडल्यास आईचीही कोरोना चाचणीही पुन्हा केली जाईल. या चाचणीच्या माध्यमातून बाळाच्या आईला याआगोदरच कोरोनाची लागण होऊन गेली आहे का हेही तपासण्यात येईल, असं गुप्ता यांनी म्हटलं आहे. सध्या तरी आईला आणि बाळाला एकत्र ठेवण्यात आलं असून चाचण्य़ा केल्यानंतर जो निकाल समोर येईल त्यावरुन या दोघांना एकत्र ठेवायचं का नाही याचा विचार केला जाईल, असही यावेळी त्यांनी म्हटलं आहे.

संबंधित बातम्या