'जो मुलींकडे डोळे वटारुन पाहील त्याला...', शिवराज सिंह चौहान यांची गर्जना

जो मुलींकडे डोळे वटारुन पाहील त्याला बर्बाद करु, असे वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे.
Shivraj Singh Chouhan
Shivraj Singh ChouhanDainik Gomantak

जो मुलींकडे डोळे वटारुन पाहील त्याला बर्बाद करु, असे वक्तव्य मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केले आहे. बाबा बुलडोझरच्या धर्तीवर स्वत:ला मामा बुलडोझर म्हणून पेश करणाऱ्या शिवराजसिंह चौहान यांनी कडक इशारा दिला आहे. ते पुढे म्हणाला, "आई-बहिणींकडे कोणाचीही चुकीची नजर गेली तर मी त्याला उद्ध्वस्त करीन, म्हणून मी बुलडोझर चालवतो.'' (MP CM Shivraj Singh Chouhan Ultimatum To Those Who Commit Crime Against Women)

दरम्यान, कन्या स्नेही पंचायतींसंबधी आवाहन करताना मुख्यमंत्री सोमवारी म्हणाले की, 'आमचे सरकार गुंड, बदमाश, दादागिरी करणाऱ्यांना सोडणार नाही.'भोपाळमध्ये (Bhopal) बिनविरोध नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींशी चर्चा करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी कन्या पूजन केले. मुख्यमंत्री शिवराज पुढे म्हणाले, 'आपण सर्वांनी मुलींचा सन्मान केला पाहिजे. मुलगा आणि मुलगी यांच्यात कोणत्याही प्रकारचा भेद करु नये.'

Shivraj Singh Chouhan
शिवराज सिंह चौहानांनी आपल्या पत्नीच्या नावाने चोरली कविता; लोक म्हणाले, 'आमदार चोरणाऱ्यांसाठी कविता चोरणे काय विशेष'

दुसरीकडे, समरससह सर्व गावांमध्ये व्यसनमुक्तीची मोहीमही राबवावी, असे आवाहन मुख्यमंत्री शिवराज सिंह (Shivraj Singh Chouhan) यांनी केले. नशामुक्त गावांना दोन लाख रुपये स्वतंत्रपणे दिले जाणार आहेत. ते पुढे म्हणाले, “समरस पंचायतींनी त्यांच्या कामाच्या बाबतीत संपूर्ण देशात आदर्श निर्माण केला पाहिजे. जनतेने बिनविरोध निवडून येऊन आपले काम केले आहे. आता जनतेची सेवा करुन गावाचा विकास करायचा आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com