सनी देओल शेतकऱ्यांसाठी कधी उठवणार 'ढाई किलोका हाथ'?; सनीने मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रावर रंधंवांचा पलटवार

गोमंतक ऑनलाईन टीम
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

खासदार सनी देओल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना रेल्वे ट्रॅक रिकामे करण्याची मागणी केली आहे. तसे लेखी पत्र देऊन त्यांनी रेल्वे बोर्डाच्या गरजेनुसार रेल्वे ट्रॅक उपलब्ध करण्याविषयी लिहिले आहे.

गुरूदासपूर- प्रसिद्ध अभिनेते आणि खासदार सनी देओल यांनी पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांना रेल्वे ट्रॅक रिकामे करण्याची मागणी केली आहे. तसे लेखी पत्र देऊन त्यांनी रेल्वे बोर्डाच्या गरजेनुसार रेल्वे ट्रॅक उपलब्ध करण्याविषयी लिहिले आहे. सनीने लिहिले की ५० दिवसांपासून शेतकरी आंदोलन सुरू असून त्यामुळे रेल्वे सेवा ठप्प आहे.   

लोकशाहीमध्ये आंदोलन करणे हा लोकांचा अधिकार आहे. मात्र, त्यासाठी अन्य नागरिकांच्या रोजगार बुडू नये, ही जबाबदारी राज्य शासनाची असते. यात पंजाब सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. रेल्वे सेवा ठप्प झाल्याने वूलन, स्पोर्टस्, ऑटो पार्ट्स, सायकल, टेक्सटाईल्स यांसारख्या उद्योगांमध्ये कच्चा माल मिळत नसल्याने काम बंद पडले आहे. तयार माल कारखान्यांमध्येच पडून आहे. एकट्या लुधियानाच्याच ड्राय पोर्टमध्ये तब्बल १५ हजार कंटेनर अडकले आहेत, असे सनी देओल यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.   

सनी देओल यांच्यावर रंधंवांनी केला पलटवार- 

कॅबिनेट मंत्री सुखविंदर सिंग रंधवा यांनी खासदार सनी देओल यांनी शेतकरी आंदोलनावर केलेल्या टिप्पणीवर तिखट प्रतिक्रिया दिली आहे. सनी देओल 'रील' मधून निघून 'रिअल' आयुष्यात यावेत आणि त्यांनी आपला अडीच किलोचा हात शेतकऱ्यांसाठी उठवावा.     
 

 

संबंधित बातम्या