केंद्र सरकाराची नारळ उत्पादकांना भेट: एमएसपीत वाढ

गोमंन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 28 जानेवारी 2021

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले की सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की, नेहमीप्रमाणेच एमएसपी शेतकऱ्यांना मिळत राहणार आहे. बॉल कोपरा (सुके खोबरे) चे एमएसपी वाढविण्यात आले आहे, असा सरकारने निर्णय घेतला आहे. 

नवी दिल्ली: केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत शेतकरी आंदोलनावरील केंद्रीय बैठकीची माहिती दिली. ते म्हणाले की, सरकारचे दरवाजे नेहमीच शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी उघडे आहेत. सरकार शेतकर्‍यांसाठी मनापासून काम करत आहे. एवढ्या वर्षात यूपीए सरकारने हा स्वामीनाथन अहवाल अंमलात आणण्याचा कधीही विचार केला नव्हता, परंतु सध्याच्या सरकारने त्या दिशेने पाऊले उचलली आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर पुढे बोलतांना म्हणाले की, 'सरकारने शेतकऱ्यांना आश्वासन दिले आहे की, नेहमीप्रमाणेच एमएसपी शेतकऱ्यांना मिळत राहणार आहे.' बॉल कोपरा (सुके खोबरे) चे एमएसपी वाढविण्यात आले आहे, असा सरकारने निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे कृषी कायद्यासंदर्भात आंदोलन अजूनही सुरू आहे. शेतकऱ्यांचा असा आरोप आहे की, नविन कायदे लागू करण्यात आल्याने एमएसपी ची सुविधा पूर्णपणे बंद होईल.  जे की  केंद्र सरकारने वारंवार म्हटल्याप्रमाणे एमएसपी सुविधा पूर्वीप्रमाणेच चालू राहणार आहे.

नारळावरील एमएसपीच्या वाढीव किंमतीबाबत बोलतांना प्रकाश जावडेकर म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कोप्राच्या (वाळलेल्या नारळाच्या) एमएसपीत 5२ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोप्राच्या एमएसपीमध्ये प्रति क्विंटल 375 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी ते प्रति क्विंटल 9960 प्रति क्विंटल असायचे, परंतु वाढ केल्यानंतर एमएसपी प्रति क्विंटल 10, 335 रुपये करण्यात आला आहे. प्रकाश जावडेकर म्हणाले की, या किंमती वाढवण्यासाठी स्वामीनाथन अहवाल लागू करण्यात आला आहे. यासोबतच शेतकऱ्यांची 40 वर्षांपासून असलेली मागणी पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा सर्वात महत्वाचा निर्णय ठरणार आहे.

Delhi Tractor Parade Violence : योगेंद्र यादवांसह 20 शेतकरी नेत्यांना दिल्ली पोलिसांकडून नोटीस -

दरम्यान प्रकाश जावडेकर म्हणाले की, सरकार शेतकर्‍यांशी संवाद साधत आहे. प्रत्येक समस्या सोडविली जाऊ शकते. 26 जोनावारी प्रजासत्ताक दिनी शेतकरी ट्रॅक्टर परेडदरम्यान झालेल्या अभूतपूर्व हिंसाचारानंतर केंद्र सरकारने प्रथमच आपली प्रतिक्रिया दिली आहे. प्रजासत्ताकदिनी आंदोलकांनी लाल किल्ल्यात घुसत शीख धर्मिय  ध्वज फडकवला होता. या प्रकाराबद्दाल बोलताना केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर म्हणाले,”घडलेला प्रकार हा निषेधार्ह आहे. दोषींवर निश्चितच कारवाई केली जाईल. लाल किल्ल्यात तिरंग्याचा ज्या प्रकारे अपमान करण्यात आला, हे भारत खपवून घेणार नाही."

 

संबंधित बातम्या