मुघल आणि ब्रिटीश वास्तुकलेचा अप्रतिम नजराणा म्हणजे दिल्लीचं मुघल गार्डन !

Mughal Garden in Delhi is a marvel of Mughal and British architecture
Mughal Garden in Delhi is a marvel of Mughal and British architecture

नवी दिल्ली :  राष्ट्रपती भवनाचं मुघल गार्डन आजपासून सगळ्यांसाठी खुलं होणार आहे. इतके दिवस कोरोनामुळे मुघल गार्डन बंद होतं. व्हॅलेंटाईन विकमध्ये प्रत्येकजण त्याच्या जोडीदारासह बाहेर फिरायला जाण्याचा विचार करतो. अशा परिस्थितीत आपण आपल्या जोडीदारासह राष्ट्रपती भवनाच्या मुघल गार्डनला भेट देऊन, नानाविध प्रकारच्या फुलांचा आणि वनस्पतींचा आनंद घेऊ शकता.

राष्ट्रपती सचिवालयानं दिलेल्या निर्देशानुसार, 13 फेब्रुवारी ते 21 मार्च दरम्यान सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत मुघल गार्डन सामान्य लोकांसाठी उघडण्यात येईल. बागेत प्रवेश फक्त ऑनलाइन बुकिंगद्वारे मिळू शकेल. मिळालेल्या माहितीनुसार, मुगल गार्डनमध्ये प्रवेश घेण्यासाठीची नोंदणी विनामूल्य आहे, ती ऑनलाईन करावी लागेल.

इतकेच नाही तर एका मोबाईल नंबरवरून एकच बुकिंग करता येणार असून, ज्यांचे बुकिंग ऑनलाईन आहे त्यांनी त्यांचे ओळखपत्र सोबत घ्यावे लागेल. /https://rashtrapatisachivalaya.gov.in/  या साइटवर क्लिक करून आपण मुघल गार्डनशी संबंधित माहिती संकलित करू शकता. राष्ट्रपती भवनाचं मुघल गार्डन पाहण्यासाठी लोक दूरदूरून येतात.

मुळची नेदरलँडची असणारीट्यूलिपची सुंदर फुले, विविध रंग आणि प्रजातींचे गुलाब आणि इतर बऱ्याच वनस्पती इथं आहेत. येथे आपण आपल्या जोडीदारासह आपण जपान आणि जर्मनीच्या फुलांचे कौतुक देखील करू शकता. मुगल गार्डनच्या आतही 12 उद्याने आहेत जी त्यांच्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहेत. अनेक ठिकाणी कारंजीही बसविण्यात आले आहेत.

मोगल गार्डन 1911 मध्ये ब्रिटिशांनी एडविन लँडॅझिएर लुटियन्स यांनी बनवले होते. त्यांनी मुघल वास्तुशैलीच्या जोरावर मुघल गार्डन बांधलं. मुघल गार्डन आयताकृती, लॉन आणि गोलाकार तीन भागात विभागलेले आहेत.

इथं यासह गुलाब गार्डन, बायो डायव्हर्टीटी पार्क, म्युझिकल फाऊंटन, हर्बल गार्डन, बटरफ्लाय, सनशाईन गार्डन, कॅक्टस गार्डन, न्यूट्रिशनल गार्डन आणि बायो फ्युएल पार्क देखील आहेत. मुगल गार्डनचे क्षेत्रफळ सुमारे 13 एकर आहे. ही बाग मुघल आणि ब्रिटीश वास्तुकलेचा अप्रतिम पुरावा आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com