Mukhtar Abbas Naqvi
Mukhtar Abbas NaqviDainik Gomantak

मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा दिला राजीनामा

भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

Mukhtar Abbas Naqvi Resigns: भाजपचे ज्येष्ठ नेते मुख्तार अब्बास नक्वी यांनी केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कॅबिनेट बैठकीत मुख्तार अब्बास नक्वी यांचे कौतुक केले. देशाच्या विकासात नक्वी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचेही पंतप्रधान मोदी म्हणाले. नक्वी यांचा उद्या राज्यसभा खासदार म्हणून शेवटचा दिवस आहे.

दरम्यान, मंत्रिमंडळ बैठकीनंतर नक्वी यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांमध्ये कोणत्या ना कोणत्या मुद्द्यावर चर्चा झाली असणारचं. मात्र याबाबत अधिकृतपणे काहीही सांगण्यात आलेले नाही. दुसरीकडे मात्र, नक्वी यांच्या भविष्यातील भूमिकेबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत.

Mukhtar Abbas Naqvi
Kaali Poster Controversy: TMC खासदार महुआ मोईत्राविरोधात FIR दाखल

दुसरीकडे, नुकत्याच झालेल्या राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणुकीत भाजपने (BJP) नक्वी यांना उमेदवारी दिली नव्हती. तेव्हापासून पक्षाकडून त्यांना नवीन भूमिका दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात होती.

वास्तविक, मुख्तार अब्बास नक्वी आणि रामचंद्र प्रसाद सिंह यांचा राज्यसभा खासदार म्हणून कार्यकाळ गुरुवारी संपत आहे. पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखाली दोन्ही केंद्रीय मंत्र्यांच्या कामांचे कौतुक करण्यात आले. ही त्यांची शेवटची मंत्रिमंडळ बैठक होती.

Mukhtar Abbas Naqvi
Kaali Poster: देवी कालीचा अपमान केल्या प्रकरणी निर्माती लीना मणिमेकलाईवर गुन्हा दाखल

तसेच, हे दोन्ही मंत्री बुधवारी आपले राजीनामे पंतप्रधानांकडे सोपवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर नक्वी यांनी भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांची पक्षाच्या मुख्यालयात जाऊन भेट घेतली. भाजपचे ज्येष्ठ नेते नक्वी हे राज्यसभेचे उपनेतेही आहेत. तर, रामचंद्र प्रसाद सिंह हे JD(U) कोट्यातून मोदी मंत्रिमंडळात (Cabinet) मंत्री आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com