Kashmir मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची हत्या; बाजारपेठेत खुलेआम घातल्या गोळ्या

दहशतवाद्याने (terrorists)श्रीनगर बाजारपेठेत उपनिरीक्षकाला (SI) खुलेआम गोळ्या घातलया, पोलिसांची शोधमोहीम सुरू.
Kashmir मध्ये पोलीस कर्मचाऱ्याची हत्या; बाजारपेठेत खुलेआम घातल्या गोळ्या
Arshid AhmedDainik Gomantak

जम्मू: काश्मीरच्या श्रीनगरमधील एका बीच मार्केटमध्ये आज रविवारी एका दहशतवाद्याने एका पोलिसाला खुलेआम गोळ्या घातल्या. जुन्या श्रीनगरमधील खानयार भागात झालेल्या या दहशतवादी घटनेत पोलीस कर्मचारी अर्शीद अहमद मीर (Arshid Ahmed Mir) हे ठार झाले. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कोण होते अर्शीद :

अर्शीद अहमद हे प्रोबेशनरी सब इन्स्पेक्टर (SI)होते. दहशतवाद्याने त्यांना मागून 2 गोळ्या घातल्या. यामध्ये ते गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने श्रीनगरच्या सौरा भागातील शेर-ए-काश्मीर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (एसकेआयएमएस) रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

Arshid Ahmed
जम्मू-कश्मीरमध्ये मोठ्या हल्ल्याची शक्यता, देशातील एजन्सीज् हाय अलर्टवर

ही घटना रविवारी दुपारी 1.35 वाजता घडली. अर्शीद मूळ काश्मीरच्या कुपवाडा जिल्ह्यातील आहे. ते खानयार पोलीस स्टेशनमध्ये तैनात होते. पोलीस हा परिसर सील केला आहे. तसेच शोधमोहीम सुरु आहे. याशिवाय राजौरी जिल्ह्यातील थानामंडी भागात सुरक्षा दल (Security forces)आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com