"भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आहेत, त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्या"

वृत्तसंस्था
सोमवार, 21 डिसेंबर 2020

भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आहेत. त्यामुळे त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्यावा, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केलं आहे. या वक्तव्यावरून वाद सुरू होण्याची चिन्हं आहेत. 

कानपूर :  भारतात पाकिस्तानपेक्षा जास्त मुस्लिम आहेत. त्यामुळे त्यांचा अल्पसंख्याक दर्जा काढून घ्यावा, असे वक्तव्य भाजपचे खासदार साक्षी महाराज यांनी केले आहे. या वक्तव्यावरून वाद सुरू होण्याची चिन्हे आहेत. ``सध्या पाकिस्तानच्या तुलनेत भारतात मुस्लिमांची संख्या अधिक आहे. भारतातील मुस्लिमांची लोकसंख्या ३२ कोटींहून अधिक झाली आहे. हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे मुस्लिमांना दिला गेलेला अल्पसंख्याकांचा दर्जा काढून घेण्यात यावा,`` असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. वाढती लोकसंख्या पाहता लोकसंख्या नियंत्रण कायदा लागू केला पाहिजे. या कायद्यानुसार दोनहून अधिक मुले असलेल्यांना सरकारी योजनांचे फायदे देऊ नयेत, असे साक्षी महाराज यांनी म्हटले आहे. गेल्या ७० वर्षांत काँग्रेसच्या सरकारांनी केल्यापेक्षा जास्त विकास गेल्या सहा वर्षांत मोदी सरकारने केला आहे असा दावा करून ते म्हणाले, ``सबका साथ, सबका विकास या नुसार भाजपचे सरकार काम करत आहे.``

 

विरोधकांवर टीका

शेतकरी आंदोलनाबद्दल साक्षी महाराज म्हणाले, ``देशातील शेतकरी शेतात काम करत आहे आणि काँग्रेसचे शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहे. कृषी कायद्यांबाबत चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. भोळ्या शेतकऱ्यांच्या खांद्यावर विरोधीपक्ष बंदूक ठेवत आहेत. ``

संबंधित बातम्या