काश्‍मिरी पंडिताला दिला मुस्लिमांनी खांदा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 24 जानेवारी 2021

एका काश्‍मीर पंडितांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी स्थानिक मुस्लिमांनी खांदा देत सुमारे आठ ते दहा किलोमीटर वाटचाल करत तो मृतदेह गावी पोहोचवल्याचा प्रकार नुकताच घडला. 

श्रीनगर :  हिमवृष्टीमुळे वाहतुक व्यवस्था ठप्प पडलेली असताना दवाखान्यात निधन झालेल्या एका काश्‍मीर पंडितांचा मृतदेह अंत्यसंस्कारासाठी गावाकडे नेणे अशक्य झाले होते. अशावेळी शोपियॉंतील स्थानिक मुस्लिमांनी खांदा देत सुमारे आठ ते दहा किलोमीटर वाटचाल करत तो मृतदेह गावी पोहोचवल्याचा प्रकार नुकताच घडला. 

भारत-पाकिस्तान कथुआ सीमेवर पुन्हा भुयार सापडले 

काश्‍मीर पंडित भास्कर नाथ (वय ६०) यांच्यावर श्रीनगर येथे एसकेआयएमएस रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु मूत्रपिंड निकामी झाल्याने त्यांचे निधन झाले. त्यांचा मृतदेह शोपियॉं जिल्ह्यातील पारगोची गावात न्यायचा होता. त्यासाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आली.

मात्र बर्फ असल्याने शोपियॉंतून गावाकडे रुग्णवाहिका नेणे अशक्य झाले. त्यामुळे  रुग्णवाहिका चालकाने शहरातील कुटुंबीयास फोन केला. त्यांनी स्थानिक मुस्लिमांना या प्रकाराची माहिती दिली. त्यानुसार काही जण रुग्णवाहिकेकडे आले आणि त्यांनी पंडितांचा मृतदेह खांद्यावर घेत पारगोची गावी नेला. 

‘देशाला चार राजधान्या हव्यात’, ममता बॅनर्जी यांनी केली मागणी

हिमवृष्टीतही अंत्यसंस्कार करणे कठीण बाब होती. परंतु हिंदू पद्धतीनुसार स्थानिकांनी सोय करत भास्कर नाथ यांच्यावर अंत्यसंस्कार केले. त्यांच्या पश्‍चात मुलगा आणि दोन मुली आहे.

संबंधित बातम्या