टाटा सन्सशी झालेल्या वादाच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाबद्दल सायरस मिस्त्री यांनी निराशा व्यक्त केली आहे. मात्र या निर्णयानंतर देखील आपण शांत मनाने झोपत असल्याचे सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे. सायरस मिस्त्री यांना 2016 मध्ये टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर हा वाद सर्वोच्च न्यायालयात गेला होता. आणि नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने याबाबत टाटा सन्सच्या बाजूने निर्णय दिला होता. यानंतर सायरस मिस्त्री यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर निवेदन जारी केले आहे.
सायरस मिस्त्री यांनी जारी केलेल्या निवेदनात, टाटा सन्सचे कार्यकारी अध्यक्ष असताना जागतिक व्यापारी समुदायासमोर भारताला एक उत्तम संधी आणि विश्वासाचा देश म्हणून सादर करण्याचे कर्तव्य आणि विशेषाधिकार होते, असे म्हटले आहे. तसेच, कायद्याचा एक प्रभावी नियम जो न्याय्य, समानतेवर आधारित आहे, असे त्यांनी पुढे सांगितले आहे. याशिवाय, टाटा सन्स मध्ये असताना भिन्न वातावरण आणि प्रदेशातील लोकांशी संस्थापकांनी तयार केलेल्या सामायिक मूल्यांच्या आधारे काम करण्याची संधी होती. आणि त्या संधीबद्दल आपण नेहमीच आभारी असल्याचे सायरस मिस्त्री यांनी निवेदनात म्हटले आहे.
West Bengal : भाजपा उमेदवार अशोक दिंडाच्या गाडीवर हल्ला; टीएमसी समर्थकांवर आरोप
याव्यतिरिक्त, पिढ्यानपिढ्या बदल होत असलेल्या टाटा सन्समध्ये एक मजबूत बोर्ड निश्चित करणे हे आपले लक्ष्य होते. व याचा उद्देश एका व्यक्ती व्यतिरिक्त निर्णय घेण्याची प्रणाली तयार करणे हा होता, असे सायरस मिस्त्री यांनी म्हटले आहे. इतकेच नाही तर, आपले मुख्य उद्दीष्ट हे मंडळाच्या सर्व संचालकांना समर्थ करणे हे होते, जेणेकरून निर्भयपणे किंवा स्वार्थाशिवाय त्यांच्या जबाबदाऱ्या पार पाडण्यात सक्षम होतील. तसेच, भागधारकांचे मत आणि रणनीती देखील त्यात दिसू शकत असल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.
त्यानंतर, पुढे सायरस मिस्त्री यांनी त्यांच्या याच धोरणामुळे टाटा सन्स त्याच्या ग्रुपच्या सर्व कंपन्यांच्या सर्व संबद्ध पक्षांच्या हितांचे रक्षण करेल असा आपल्याला विश्वास असल्याचे सांगितले आहे. कामगिरीचे टाटा बोर्डाच्या विविध गटांमधील सुमारे 50 स्वतंत्र संचालकांनी पुनरावलोकन केले आणि त्यांची मते सर्व काही सांगत असल्याचे सायरस मिस्त्री यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे. आणि हेच आपल्या पुढाकाराने घेतलेल्या कौतुकाची थाप असल्याचे त्यांनी पुढे आपल्या निवेदनात नमूद केले आहे.