
BJP Vs Congress: देशातील राजकारण मागील दिवसांपासून भाजप-कॉंग्रेसमधील आरोप-प्रत्यारोपांच्या भोवती फिरत आहे. यातच आता काँग्रेसच्या आरोपांवर स्मृती इराणी म्हणाल्या की, ''माझी मुलगी 18 वर्षांची आहे, ती राजकारण करत नाही. महाविद्यालयीन विद्यार्थी आहे. ती बार चालवत नाही. काँग्रेसने आरटीआयच्या आधारे माझ्या मुलीवर आरोप केले आहेत. परंतु, ज्या आरटीआयबद्दल बोलले जात आहे, त्यात माझ्या मुलीचा उल्लेख नाही. अमेठीतील पराभव गांधी परिवाराला पचवता आलेला नाही, त्यामुळे असे आरोप करत केले जात आहेत. त्याविरोधात मी न्यायालयात जाणार आहे.''
दरम्यान, काँग्रेस नेते पवन खेरा यांनी पत्रकार परिषद घेऊन स्मृती इराणीं यांच्यावर गंभीर आरोप केले. माझ्या 18 वर्षीय मुलीवर कॉंग्रेसकडून (Congress) घाणरडे आरोप केले गेले, असे इराणी यांनी म्हटले. तर दुसरकीडे, आरटीआय अंतर्गत ही माहिती मिळाल्याचा दावा काँग्रेस नेत्याने केला. प्रत्युत्तरात स्मृती इराणी (Smriti Irani) म्हणाल्या की, 'माझ्या मुलीवर खोटे आरोप करणाऱ्या काँग्रेसला मी कोर्टात जाऊन धडा शिकवेन.' इराणी पुढे म्हणाल्या, 'माझी मुलगी केवळ 18 वर्षांची असून महाविद्यालयीन विद्यार्थिनी (Student) आहे, ती बार चालवत नाही. माझी दोन्ही मुले राजकारणात नाहीत.'
गांधी घराण्याच्या इशाऱ्यावर हल्ला
काँग्रेसच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माझ्या मुलीवर जे बिनबुडाचे आरोप केले आहेत, ते सर्व गांधी घराण्याच्या इशाऱ्यावर लावले आहेत, असे स्मृती इराणी म्हणाल्या. माझ्या मुलीचे नाव आरटीआयमध्ये आहे, असे जयराम रमेश (Jairam Ramesh) म्हणाले. मला त्यांना विचारायचे आहे की, त्यांनी माझ्या मुलीचे नाव दाखवावे?
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.