एन.व्ही. रमण होणार सर्वोच्च न्यायालयाचे नवे सरन्यायाधीश

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 24 मार्च 2021

सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे उत्तराधिकारी म्हणून केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

नवी दिल्ली: सर्वोच्च न्यायालयाचे सरन्याधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल लवकरच संपणार आहे. नव्या सरन्यायाधीशांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्र सरकारकडून सरन्यायाधीश पदासाठी नवीन नावांची यादी मागवण्यात आली आहे. सरन्यायाधीश शरद बोबडे यांचे उत्तराधिकारी म्हणून केंद्र सरकारकडे न्यायमूर्ती एन. व्ही. रमण यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

पुढील महिन्यातील 23 एप्रिलला सरन्यायाधीश शरद बोबडे यांचा कार्यकाल संपत आहे. त्य़ामुळे केंद्र सरकारकडून त्वरित सरन्यायाधीश निवडीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. केंद्र सरकराने काही दिवसांपूर्वीच सरन्यायाधीश पदासाठी नवीन नावे सूचवण्याची सूचना केली होती. केंद्रीय कायदा मंत्री रवी शंकर प्रसाद य़ांनी यासंबंधीचे पत्र सरन्यायाधीशांना पाठवले होते. सर्वात जास्त अनुभव असलेल्या न्यायमूर्तींची नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्य़ायाधीश पदी केली जाते. सध्या सरन्य़ायाधीश शरद बोबडे यांच्यानंतर सर्वाधिक जेष्ठ न्यायमूर्ती एन. व्ही. रमण आहेत. त्यामुळे न्यायमूर्ती शरद बोबडे यांनी न्यायमूर्ती रमण यांच्य़ा नावाची शिफारस केंद्र सरकारकडे केली आहे.(N V Raman will be the new Chief Justice of the Supreme Court)

दिल्ली सरकारला झटका; उपराज्यपालांना व्यापक अधिकार देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

न्यायमूर्ती एन.व्ही. रमण यांचा जन्म आंध्रप्रदेशातील पोन्नावरम गावातील शेतकरी कुटुंबामध्ये झाला आहे. कृष्णा जिल्ह्यामध्ये पोन्नावरम गाव येते. 10 फेब्रुवारी 1983 पासून रमण यांनी वकिली करण्यास सुरुवात केली. रमण यांचं शिक्षण बी.एस्सी.बी एल. झालेले असून फौजदारी आणि संविधान तसेच आंतरराज्यीय नदी कायद्यांमध्ये त्यांनी विशेषज्ञता प्राप्त केली आहे.
 

संबंधित बातम्या