एन.व्ही रमना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती
N V Ramana today appointed as the Chief Justice of India

एन.व्ही रमना यांची सरन्यायाधीशपदी नियुक्ती

भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज न्यायमूर्ती एन.व्ही रमना यांची भारताच्या सरन्यायाधीश पदी नियुक्ती केली आहे. एन.व्ही रमना हे भारताचे 48 वे सरन्यायाधीश असणार आहेत. यापूर्वी शरद बोबडे हे भारताचे सरन्यायाधीश पदावर होते. 1 मार्च रोजी कायदामंत्री रविशंकर प्रसाद (रविशंकर प्रसाद) यांनी भारताचे सरन्यायाधीश शरद  बोबडे यांना पत्र लिहून आपल्या उत्तराधिकारी संबंधित सूचना व शिफारसी देण्यास सांगितले. (N V Ramana today appointed as the Chief Justice of India)

नव्याने नियुक्त करण्यात आलेले नूथलपती वेंकट रमना (N.V.Ramana) यांचा जन्म 27 ऑगस्ट 1957 रोजी झाला असून ते मूळचे आंध्र प्रदेशातील कृष्णा जिल्ह्यातील पोन्नवरम गावातील आहेत. नूथलपती वेंकट रमना हे सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीश होते. यापूर्वी, ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाचे कार्यवाहक मुख्य न्यायाधीश होते.

न्यायमूर्ती शरद अरविंद बोबडे (Sharad Bobade) यांनी भारताचे 47 वे सरन्यायाधीश (CJI) पदभार भूषवला.  राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी 18 नोव्हेंबर 2018 साली शरद अरविंद बोबडे यांची सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती केली होती. 

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com