संरक्षण अभ्यास संस्थेला मनोहर पर्रीकरांचे नाव

2016 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान केलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि वन रँक वन पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्रीकर यांनी घेतलेले कष्ट सर्वांना परिचित आहेत
संरक्षण अभ्यास संस्थेला मनोहर पर्रीकरांचे नाव
Name of Manohar Parrikar to Institute of Defense Studies

पणजी: माजी संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी देशासाठी दिलेल्या अतुलनीय योगदानची ओळख रहावी या उद्देशाने दिल्लीस्थित संरक्षण अभ्यास आणि विश्लेषण संस्थेला मनोहर पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. या फलकाचे अनावरण केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या उपस्थितीत दिल्लीत पार पडले.

Name of Manohar Parrikar to Institute of Defense Studies
राज्यपालांच्या पत्रव्यवहाराची माहिती उपलब्ध नसल्याने रॉड्रिग्ज यांचा आव्हान अर्ज

2016 च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यान केलेल्या सर्जिकल स्ट्राइक आणि वन रँक वन पेन्शन योजनेच्या अंमलबजावणीसाठी पर्रीकर यांनी घेतलेले कष्ट सर्वांना परिचित आहेत. या योगदानाची आठवण राहावी या उद्देशाने या संस्थेला पर्रीकर यांचे नाव देण्यात आले आहे. पर्रीकरांचा स्वदेशीकरण्याचा आग्रह आणि राजकीय लष्करी समन्वयासाठी प्रयत्नांमुळे संरक्षण खात्यांमधील विविध शस्त्रे निर्मितीसाठी होऊ शकली आहे.

राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंध या क्षेत्रात सर्वोत्तम थिंक टॅंक असणारी ही संस्था भारतीय संरक्षण दलासाठी महत्त्वाची आहे. यावेळी संस्थेचे महासंचालक आंबे, सुजन चिनॉय, संस्थेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com