अयोध्येतील मशिदीला देणार क्रांतिकारकाचे नाव?

The name of the revolutionary to be given to the mosque in Ayodhya
The name of the revolutionary to be given to the mosque in Ayodhya

अयोध्या: सर्वोच्च न्यायालयाने अयोध्येबाबत दिलेल्या ऐतिहासिक निकालानंतर राम मंदिराच्या उभारणीला सुरुवात झाली असताना मशिदीसाठीच्या हालचालींनाही वेग आला आहे. येथे नव्याने उभारल्या जाणाऱ्या मशिदीला थोर क्रांतिकारक मौ. अहमदुल्लाह शाह यांचे नाव देण्याचा विचार सुरू आहे. ब्रिटिशांविरोधात 1857 साली झालेल्या उठावामध्ये त्यांचा सक्रीय सहभाग होता. सुन्नी वक्फ बोर्डाने स्थापन केलेल्या इंडो इस्लामिक कल्चरल फाउंडेशन हा ट्रस्टच्या देखरेखीखाली या मशिदीच्या उभारणीचे काम सुरू आहे. अवध प्रांतामध्ये 1857 साली झालेल्या उठावाचे मौ. अहमदुल्लाह शाह हे दीपस्तंभ मानले जातात. अयोध्येमधील वास्तूला त्यांचे नाव देण्याबाबत आमचा गांभीर्याने विचार सुरू असल्याचे या ट्रस्टचे सचिव अतहर हुसैन यांनी सांगितले.

बंधूभाव अन्‌ देशभक्तीचे प्रतीक

मशिदीसाठी ट्रस्ट स्थापन झाल्यानंतर नव्याने उभारल्या जाणाऱ्या वास्तूला बाबराचे नाव द्यायचे की नाही याबाबत देखील बराच खल झाला, अन्य नावांच्या प्रस्तावांवर देखील यावेळी चर्चा करण्यात आली. अयोध्येतील वास्तू ही धार्मिक बंधूभाव आणि देशभक्तीचे प्रतिक ठरावे म्हणून हा प्रकल्प शाह यांना समर्पित करण्याचा निर्णय घेण्यात आला.  मौ. अहमदुल्लाह शाह हे भारतीय मूल्ये आणि इस्लामचे खरेखुरे अनुयायी होते, असे ट्रस्टकडून सांगण्यात आले. याबाबत ट्रस्टकडे विविध नावांचे प्रस्ताव आले होते, त्या प्रस्तावांमध्ये शाह यांच्या नावांचा उल्लेख होता, याबाबत आणखी चर्चा केल्यानंतर आम्ही या नावाची घोषणा करू, असे ट्रस्टने सांगितले.

मुस्लिम धर्माचे पालन करणारे अहमदुल्लाह शाह हे गंगा- यमुना सांस्कृतिक ऐक्याचे आदर्श उदाहरण होते. 1857 च्या उठावामध्ये कानपूरमधील नानासाहेब आणि अराचे कुंवरसिंह हे देखील शाह यांच्या बाजूने लढले होते.

- रामशंकर त्रिपाठी,

स्थानिक इतिहास संशोधक

 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com