रोशनी कायद्याअंतर्गत जमीनीचा लाभ उठविणाऱ्यांमध्ये फारूख अब्दुल्ला यांच्या बहिणीचे नाव

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 26 नोव्हेंबर 2020

रोशनी कायद्याअंतर्गत जमीनीचा लाभ उठविणाऱ्या २६९ जणांची दुसरी यादी जम्मू प्रशासनाने जाहीर केली असून यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची बहिण, एक महंत आणि दोन हॉटेल व्यावसायिकांच्या नावांचा समावेश आहे. रोशनी कायदा आता रद्द करण्यात आला आहे. 

श्रीनगर  : रोशनी कायद्याअंतर्गत जमीनीचा लाभ उठविणाऱ्या २६९ जणांची दुसरी यादी जम्मू प्रशासनाने जाहीर केली असून यामध्ये नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांची बहिण, एक महंत आणि दोन हॉटेल व्यावसायिकांच्या नावांचा समावेश आहे. रोशनी कायदा आता रद्द करण्यात आला आहे. 

रोशनी कायद्याअंतर्गत २.५ लाख एकर जागा त्यांच्या ताबेदारांच्या नावावर करण्यात आली होती. हा कायदा अवैध असल्याचा निकाल उच्च न्यायालयाने देत सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. जम्मू काश्‍मीर केंद्रशासित प्रदेशाने १ नोव्हेंबरला कायदाच रद्द करत कायद्याचा फायदा घेत जमीन नावावर करून घेणाऱ्यांची यादी प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली आहे. या यादीत, फारुख यांच्या भगिनी सुरिया अब्दुल्ला, काँग्रेस नेते के. के. अमला, मुश्‍ताक अहमद चाया यांचा समावेश आहे. 

अधिक वाचा : 

उत्तर प्रदेशात बळजबरीने धर्मांतर केल्यास तुरुंगाची हवा

बिहार विधानसभा अध्यक्षपदी ‘एनडीए’चे विजय कुमार सिन्हा

बिहारमध्ये ‘एनडीए’च्या आमदारांना लालूंचे मंत्रिपदाचे आमिष

 

संबंधित बातम्या