दशकांपासून ईशान्येकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर 'ट्विटास्त्र'  

दशकांपासून ईशान्येकडे दुर्लक्ष केल्याचे म्हणत नरेंद्र मोदी यांचे काँग्रेसवर 'ट्विटास्त्र'  
Narendra Modi

देशातील चार राज्ये आणि एक केंद्र शासित प्रदेशात आगामी काही दिवसांमध्ये विधानसभेच्या निवडणूक पार पडणार आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेससह राज्यातील स्थानिक पक्षांवर जोरदार टीका केली आहे. पंत्रप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज काँग्रेस पक्षावर निशाणा साधताना काँग्रेसने दशकांपासून ईशान्य भारताकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. मात्र एनडीए सरकार हे कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी पुढे नमूद केले. (Narendra Modi has criticized the Congress for neglecting the North East from decades)

राज्यांमधील आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज विरोधी पक्षांवर जोरदार हल्ला चढवल्याचे पाहायला मिळाले. कॉंग्रेसवर टीका करताना नरेंद्र मोदी यांनी, अनेक दशकांपर्यंत ईशान्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. परंतु 2016 पासून एनडीए सत्तेत आल्यानंतर कनेक्टिव्हिटी आणि सामाजिक सक्षमीकरणावर लक्ष केंद्रित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आसाम मधील करीमगंजमध्ये एका जाहीर सभेला संबोधित केल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरील ट्विटरवर ट्विटकरत संवाद साधला. व यावेळी त्यांनी करीमगंजच्या जनतेचे आभार मानले. 

त्यानंतर, नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी आपला मोर्चा पश्चिम बंगालकडे वळवत राज्यातील सत्ताधारी पक्ष तृणमूल कांग्रेसवर टीकास्त्र सोडले. पश्चिम बंगालबाबत ट्विट करताना, त्यांनी पश्चिम बंगालमध्ये विकासाचे नवे पर्व लवकरच सुरू होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच पश्चिम बंगालमध्ये भाजपाचा विजय हा राज्यातील विकासाच्या नव्या युगाची सुरुवात दर्शवणारा असल्याचे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये पुढे लिहिले आहे. आणि त्याचबरोबर टीएमसीच्या कार्यकर्त्यांकडून होणारी गुंडगिरी देखील थांबेल असे म्हणत, पुरुलिया येथील भेटीची काही दृश्ये शेअर नरेंद्र मोदी यांनी शेअर केली आहेत. 

दरम्यान, गुरुवारी नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगाल मधील पुरुलिया येथील जाहीर सभेत बोलताना राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली होती. यावेळी त्यांनी नोकरी, विकास आणि शिक्षणाचे आश्वासन देताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या खेला होबे यावरून चांगलाच निशाणा साधला होता. ''दीदी बोले खेला होबे, भाजपा बोले चाकरी होबे. दीदी बोले खेला होबे, भाजपा बोले विकास होबे. दीदी बोले खेला होबे, भाजपा बोले शिक्षा होबे. खेला शेष होबे, विकास आरंभ होबे," असे नरेंद्र मोदी यांनी म्हटले होते.  

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.