कृषी कायद्यांमधील त्रुटी दाखवा, चर्चा करू : पंतप्रधान नरेंद्र मोदीचं पुन्हा प्रत्युत्तर

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 26 डिसेंबर 2020

तुमच्या जमिनीत कंत्राटी शेतीचा वापर करून तुम्ही आल्याचे पीक घेता, मग ती कंपनी आल्याबरोबर जमीनही बरोबर घेऊन जाते का? असा उपरोधिक सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना पुन्हा प्रत्युत्तर दिलं.

नवी दिल्ली  :   तुमच्या जमिनीत कंत्राटी शेतीचा वापर करून तुम्ही आल्याचे पीक घेता, मग ती कंपनी आल्याबरोबर जमीनही बरोबर घेऊन जाते का? असा उपरोधिक सवाल करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कृषी कायद्यांच्या विरोधात राजकारण करणाऱ्यांना पुन्हा प्रत्युत्तर दिले. विरोधकांनी कृषी कायद्यांतील त्रुटी दाखवून द्याव्यात, सरकार त्यावर चर्चा करायला तयार आहे, असे ते म्हणाले. दिवंगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त ‘पीएम किसान सन्मान’ निधीच्या ९ कोटींहून जास्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पंतप्रधानांच्या हस्ते आज  १८ हजार कोटींचा निधी थेट हस्तांतरित करण्यात आला. प्रत्येक शेतकऱ्याच्या खात्यात २-२ हजार रुपये थेट जमा झाले. देवाने आम्हालाच सारी बुध्दी दिल्याचा आमचा दावा नाही. कायद्यात काही त्रुटी असतील तर त्या सांगाव्यात.

लोकशाहीत चर्चा-संवाद तर हवाच, असेही त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांशी साधलेल्या संवादात मोदींनी दिल्लीतील  आंदोलनावरून विरोधकांवर टीकास्त्र सोडले. शेतकऱ्यांना आंदोलनाचा हक्क आहे पण त्यांच्या नावावर त्यांची दिशाभूल करू नये‘ फोटो छापून येण्यासाठी सध्या दिल्लीत शेतकऱ्यांना भडकावणाऱ्यांनी वर्षानुवर्षे सत्तेवर राहून छोट्या शेतकऱ्याला बरबाद का व कसे केले ? ३०-३० वर्षे बंगालमध्ये राज्य करणाऱ्यांनी त्या राज्याची काय दुर्दशा केली ? दिल्लीत येऊन शेतकऱ्यांना भडकावणाऱ्यांनी केरळमध्ये बाजार समिती कायद्यासाठी दारे  का बंद केली आहेत? पश्‍चिम बंगालमध्ये राजकीय कारणांसाठी केंद्राच्या कल्याणकारी योजना अडवून दिल्लीत येऊन देशाची अर्थव्यवस्था बरबाद करण्यासाठी कोण उतरले आहे ? असे प्रहार करून मोदींनी विरोधकांवर हल्लाबोल केला.

सत्य ऐकावेच लागेल

शेतकऱ्यांच्या नावावर स्वतःचे झेंडे घेऊन खेळ करणाऱ्यांना, राजकीय मैदानात स्वतःला जिवंत ठेवण्यासाठी शेतकऱ्यांच्या रूपात जडीबुटी शोधणाऱ्यांना आता सत्य ऐकावे लागेल. देशात इतकी वर्षे राज्य करून त्यांच्या धोरणांमुळे छोटा शेतकरी सर्वाधिक बरबाद झाला

संबंधित बातम्या