पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला भारत आणि इंग्लंडच्या सामन्याचा सुरेख फोटो

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला भारत आणि इंग्लंडच्या सामन्याचा सुरेख फोटो
Copy of Gomantak Banner - 2021-02-14T224023.974.jpg

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज तमिळनाडू राज्यातील चेन्नईच्या दौऱ्यावर होते. यावेळेस पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील अनेक विकासकामांचे उदघाटन केले. याशिवाय डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने (डीआरडीओ) विकसित केलेल्या अर्जुन टॅंकची पुढील आवृत्ती सेने दलाच्या प्रमुखांकडे सोपविली. यासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या सोशल मीडियावरील ट्विटरवरून एक मजेशीर पोस्ट शेअर केली. नरेंद्र मोदी यांनी चेन्नई येथे सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्याचे हवाई दृश्य शेअर केले. 

भारत आणि इंग्लंड यांच्यातील चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना चेन्नईच्या चेपक मैदानावर खेळवण्यात येत आहे. आणि सामना चालू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विमान या मैदानाच्या जवळून गेले. यावेळेस नरेंद्र मोदी यांनी स्टेडियमचा फोटो काढून तो सोशल मीडियाच्या ट्विटरवर पोस्ट केला. शिवाय, पंतप्रधानांनी या पोस्ट सोबत 'चेन्नईत सुरू असलेल्या मनोरंजक सामन्याचे एक हवाई दृश्य पाहायला मिळाले', असे लिहीत पुढे भारत आणि इंग्लंडचा झेंडा कॅप्शन म्हणून दिला आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केलेल्या फोटोत स्टेडियम मध्ये सुरु असलेला सामना आणि उपस्थित प्रेक्षक देखील दिसत आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसरा कसोटी सामना कालपासून सुरु झाला आहे. या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्यानंतर भारतीय संघाने पहिल्या डावात 329 धावा केलेल्या आहेत. तर पाहुण्या इंग्लंड संघाचा पहिला डाव 134 धावांवर आटोपल्यामुळे टीम इंडियाने पहिल्या डावात 195 धावांची आघाडी मिळवली आहे.   

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com