मंदिरात जाऊन प्रार्थना करणे चुकीची आहे का? म्हणत, नरेंद्र मोदींनी साधला ममता बॅनर्जींवर निशाणा

मंदिरात जाऊन प्रार्थना करणे चुकीची आहे का? म्हणत, नरेंद्र मोदींनी साधला ममता बॅनर्जींवर निशाणा
narendra modi bangal.jpg

पश्चिम बंगाल मध्ये सुरु असणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी जोरदार प्रचार सभा घेताना दिसत आहेत. पश्चिम बंगालच्या जयनगर  मदरदार संघात त्यांनी आज प्रचार सभा घेतली. यावेळी पश्चिम बंगाल मधील मतदारांनी पहिल्या टप्प्यात अतिशय शांततापूर्ण वातावरणार विक्रमी मतदान केले. तसेच त्यांनी, भारतीय जनता पक्षाला मतदारांनी मोठे समर्थन दिल्याचे सांगत मतदारांचे आभार देखील मानले.  (Narendra Modi targets Mamata Banerjee from Assam.)  

यावेळी प्रचार सभेला संबोधित करत असताना, "काही दिवसांपूर्वी मी बांगलादेशमध्ये आलो असताना, तिथे आपण 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या जळेश्वरी काली माता मंदिरात जाऊन प्रार्थना केली, आणि ममता दीदींनी यावर आक्षेप घेतला, त्यानंतर मी ओराकान्दी में हॉरीचॉन्द ठाकुर, गुरुचॉन्द ठाकुर यांच्या पवित्र भूमीवर गेलो आणि संपूर्ण देशासाठी आशीर्वाद मागितला. हे पाहून दीदींचा राग अजूनच वाढला,  मा कालीच्या मंदिरात जाणे चुकीचे आहे का? होरीचंद ठाकूरजी यांना नमन करणे चुकीचे आहे का?" असे प्रश उपस्थित करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ममता बॅनर्जींवर (Mamta Bannerjee) निशाणा साधला.  

कोरोना काळात भाजप (BJP) सरकारने विनामूल्य तांदूळ वाटप केले, तर त्यावर सुद्धा आक्षेप.  प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत देशभरात कोट्यवधी घरे बांधून देण्याची योजना केली. त्याअंतर्गत बंगालमध्ये (West Bengal) केंद्र सरकारने गरीबांसाठी 30 लाखाहून अधिक घरे मंजूर केली आहेत. परंतु राज्यसरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे, अनेकी गरीब लोकांना अजूनही घर नाही. पंतप्रधान पुढे म्हणाले की तृणमूलच्या डावपेचांमुळे गरीब, मध्यमवर्गीय लोकांना जगणे कठीण झाले आहे.  

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com