पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हस्ताक्षर पाहून तुम्हीही म्हणाल, वाह...  

दैनिक गोमन्तक
रविवार, 28 मार्च 2021

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यावर झालेल्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत आणि बांगलादेश या दोन्ही देशांनी दहशतवादाच्या प्रश्नावर एकजूट आणि जागरूकता दाखविण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. यानंतर नरेंद्र मोदींनी ढाकापासून जवळच असलेल्या राष्ट्रीय स्मारकाला भेट देऊन पुष्पचक्र वाहिले. यावेळेस नरेंद्र मोदींनी व्हिजिटर्स डायरी मध्ये संदेश लिहिला. मात्र नरेंद्र मोदींनी लिहिलेल्या संदेशावरून त्यांच्या हस्ताक्षराबाबत सोशल मीडियावर पुन्हा एकदा जोरदार चर्चा रंगली आहे. (Narendra Modi wrote his opinion in the visitors book of the national monument of Bangladesh)  

पंत्रप्रधान नरेंद्र मोदी हे कोरोनाच्या काळानंतर प्रथमच दोन दिवसांच्या बांगलादेश दौऱ्यावर आहेत. यावेळी नरेंद्र मोदी बांगलादेशच्या सुवर्णमहोत्सवी स्वातंत्र्यदिनाच्या कार्यक्रमात सहभागी झाले. याशिवाय नरेंद्र मोदींनी मागील वर्षाचा गांधी शांतता पुरस्कार बंगबंधू शेख मुजीबूर रहमान यांच्या कन्येकडे सोपवला. तसेच ढाका येथील राष्ट्रीय स्मारकावर त्यांनी श्रद्धांजली वाहिली. यानंतर नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रीय स्मारकाच्या व्हिजटर्स बुक मध्ये आपला अभिप्राय लिहिला. मात्र त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फक्त भाषणातच माहीर नसून ते लिहिण्यात देखील उत्तम असल्याचे स्पष्ट होत आहे. 

दरम्यान, यापूर्वी देखील नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षरावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 29 आणि 30 सप्टेंबर रोजी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना देखील त्यांनी व्हाईट हाऊसच्या व्हिजिटर्स डायरी मध्ये नोट लिहिली होती. आणि त्यावेळी तत्कालीन विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी नरेंद्र मोदींच्या नोटचा फोटो सोशल मीडियाच्या ट्विटरवरून पोस्ट केला होता.  

        

संबंधित बातम्या