नरेंद्र मोदींचे ‘एक्साम वॉरियर्स’ पुस्तक देणार विद्यार्थ्यांना परीक्षेचे धडे

दैनिक गोमंतक
सोमवार, 29 मार्च 2021

हे पुस्तक परीक्षेपूर्वी तणावमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करेल असे आश्वासन देखील पंतप्रधानांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी बोर्डाच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर  ‘एक्साम वॉरियर्स’ या आपल्या पुस्तकाची नवीन आवृत्ती प्रसिद्ध केली आहे. पुस्तकाच्या नवीन आवृत्तीची घोषणा करताना,'परीक्षा वॉरियर्सची नवीन आवृत्ती विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या मौल्यवान सूचना आणि मार्गदर्शनाने समृद्ध असून, परिक्षेच्या काळात तणावमुक्त राहण्यासाठी मदत करणारी असेल' असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. (Narendra Modi's New book Exam Warriors will give exam lessons to students)

'एक्झाम वॉरियर्सची'(Exam Warrior) नवीन आवृत्ती आता उपलब्ध झाली आहे आणि याचा मला आनंद झाला आहे असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी  ट्वीट करत या गोष्टीची माहिती दिली. या आवृत्तीमध्ये विद्यार्थी व पालकांसाठी अनेक आकर्षक उपक्रम आहेत. ‘एक्साम वॉरियर्सची’ नवीन आवृत्ती विद्यार्थी, पालक व शिक्षकांकडून मौल्यवान मिळालेल्या सूचनांनी समृद्ध झालेली आहे. त्यात नवीन भाग जोडले गेले आहेत, विशेषत: पालक आणि शिक्षक ज्यांना ते खूप आवडतील अशी अशा देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी व्यक्त केली.

या पुस्तकात परीक्षेसाठी (Board Exam) नवीन मंत्र आणि अनेक मनोरंजक उपक्रम आहेत. हे पुस्तक परीक्षेपूर्वी तणावमुक्त राहण्यासाठी विद्यार्थ्यांना मदत करेल असे आश्वासन देखील पंतप्रधानांनी दिले. दरम्यान परीक्षांपुर्वी परीक्षा पे चर्चा 2021 या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थी(Students), शिक्षक आणि पालकांशी देखील आपण संवाद साधणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हस्ताक्षर पाहून तुम्हीही म्हणाल, वाह...  

संबंधित बातम्या